जळगाव : राज्यात भाजप- शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे. दोन्ही पक्षातील समन्वयातून सरकार चालवली जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण राज्याचा कारभार चालवत आहे. असे असताना मात्र जळगाव जिल्ह्यात भाजपा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधील कुरबुरी समोर आल्या आहेत. भाजप खासदाराने शिंदे सरकारच्या मंत्र्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे युतीतील नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजप खासदारने शिवसेनेच्या मंत्र्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यात भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास मंत्रीपद आहेत तर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा विभागाचे मंत्रिपद आहे. मात्र जेव्हा दोन्ही नेत्यांमधील चढाओढ काही लपून राहिलेली नाही. अधून मधून या नेत्यांमधील वादविवाद समोर येत असतात. भाजपा खासदार उमेश पाटील यांनी या आपल्या मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यांनी विकास कामांच्या उद्घाटनांमध्ये आपल्याला डावले जात असल्याचे खंत उघडपणे व्यक्त केली आहे.
उद्घाटन कार्यक्रमात निमंत्रणवरून नाराजी
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. मात्र या कार्यक्रमांना जिल्ह्यातील भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन व खासदारांना बोलवले जात नाही. भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटलांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
तरच आरोप दूर होतील
जलजीवन मिशन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आली आहे. या योजनेसाठी केंद्राने बजेट दिले आहे. त्यामुळे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे खासदारांना व जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांना बोलवल्या समाजामध्ये चांगलं चित्र येईल, अशी प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले की. जलजीवन मिशन योजनेचे कार्यक्रम सर्वसमावेशक व्हावे अशी अपेक्षा आहे. शिवसेनेवर होत असलेले खोके, ओके वगैरे आरोप दूर करायचे असेल व खरोखर चांगलं काम दाखवावे लागणार आहे. कामाच्या माध्यमातून आरोप दूर करता येईल, असे उन्मेष पाटील यांनी गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.