रावेर : प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते अनिल चौधरी यांनी रावेर विधानसभा मतदारसंघातून तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीला आता वर्षभरापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. रावेर मतदारसंघात रावेर आणि यावल हे दोन्ही तालुके येतात. या दोन्ही तालुक्यांमध्ये संपर्क वाढविण्यासाठी अनिल चौधरी यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
मतदार संघात वेगाने संपर्क निर्माण व्हावा आणि कार्यकर्त्यांना सहज भेटता यावे यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून खिरोदा प्र. यावल येथे निवासस्थान करण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पार्टीने नेते अनिल चौधरी यांनी घेतला आहे. मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत ४५ हजार पेक्षा अधिक मतदान घेऊन श्री चौधरी जिल्हाभरात चर्चेत आले होते. रावेर विधानसभा मतदारसंघातील जनता मागील चाळीस वर्षा पासुन सतत नवीन चेहऱ्याला निवडुन देत आली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपल्या बाजुने कौल द्यावा या राजकीय रणनीतीने प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते अनिल चौधरी कामाला लागले आहे.
स्व.हरिभाऊ जावळेंना बसला होता फटका
श्री चौधरी विधानसभा मतदारांशी थेट संर्पकात आहे. मागील निवडणुकीत पहील्यांदाच विधानसभा निवडणुक लढवत ४५ हजार पेक्षा अधिक मते त्यांनी घेतली होते.याचा फटका स्व हरिभाऊ जावळे यांना बसला होता. अनेक जानकार सांगतात अनिल चौधरींनी अजुन थोडी ताकद लावली असती तर विजश्रीची माळ त्यांच्याच गळ्यात पडली असती. रावेर व यावल दोन्ही तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यात सोपे जावे म्हणून प्रहार जनशक्तीचे नेते अनिल चौधरी आपले निवासस्थान खिरोदा प्र रावेर येथे करणार असल्याचे त्यांनी स्वता:पत्रकारांना सांगितले.