नवी दिल्ली: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने ISRO प्रोपल्शन कॉम्प्लेक्स, महेंद्रगिरी मधील तंत्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक यासह अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार isro.gov.in आणि iprc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. भर्तीसाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात. 27 मार्चपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल आहे.
यावर्षी एकूण 63 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना ISRO Bharti 2023 अंतर्गत नोकरी मिळवायची आहे त्यांनी आधी या गोष्टी वाचा.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 27 मार्च
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल
शैक्षणिक पात्रता काय आहे?
तंत्रज्ञ ‘बी’ (फिटर) – एनसीव्हीटीकडून फिटर ट्रेडमध्ये एनटीसी (किंवा) एनएसी आणि आयटीआय प्रमाणपत्रासह एसएसएलसी/एसएससी/मॅट्रिक्युलेशन/10वी उत्तीर्ण.
तांत्रिक सहाय्यक (मेकॅनिकल) – यांत्रिक अभियांत्रिकी (किंवा) उत्पादनात प्रथम श्रेणी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया :
इस्रोच्या या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड लेखी चाचणी, कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. प्रत्येक पदासाठी कौशल्य चाचणी वेगळी असू शकते. जसे ड्रायव्हरसाठी ड्रायव्हिंग टेस्ट, फायरमनसाठी शारीरिक चाचणी इ.
पगार किती मिळणार
तंत्रज्ञ स्तर 3 – रु 21,700/- ते रु. 69,100/-
तांत्रिक सहाय्यक स्तर 7 – रु 44,900/- ते रु 1,42,400/-
अर्ज फी:
इस्रोच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना तांत्रिक सहाय्यक पदासाठी रुपये 750 आणि इतर पदांसाठी 500 रुपये भरावे लागतील.