मुंबई : केंद्र सरकार मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना राबवत आहे. या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात. सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकालीन योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून पालक आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जोडू शकतात. अलीकडेच सरकारने या योजनेच्या व्याजदरातही वाढ केली आहे. चालू तिमाहीसाठी सरकारने व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8 टक्के केला आहे.
सुकन्या समृद्धी योजनेला 21 वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु पालकांना सुरुवातीच्या 15 वर्षांसाठीच पैसे जमा करावे लागतील. पैसे जमा न करता खाते सहा वर्षे चालू राहते. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत 10 वर्षांखालील मुलींचे खाते त्यांच्या पालकांच्या नावावरच उघडले जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही वार्षिक 250 ते 1.50 लाख रुपये जमा करू शकता. योजनेच्या खात्यातील गुंतवणुकीची रक्कम रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्ट किंवा बँकेद्वारे स्वीकारल्या जाणार्या इतर कोणत्याही पद्धतीने देखील जमा केली जाऊ शकते.
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर काढता येणार रक्कम
सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षात परिपक्व होत आहे. मात्र, मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर या खात्यातून शिक्षणासाठी रक्कम काढता येईल. संपूर्ण रक्कम 21 वर्षांनंतरच काढता येईल. फेब्रुवारी 2023 पर्यंत या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 3 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. 2015 मध्ये, मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली. तुम्ही या योजनेत फक्त 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
अशा प्रकारे 65 लाख रुपये मिळतील
योजना पूर्ण होईपर्यंत मुलीसाठी 65,93,071 रुपये जमा होतील.
मॅच्युरिटी व्हॅल्यू – 65, 93, 071
निव्वळ व्याज – 43, 43, 071
एकूण गुंतवणूक – 22, 50, 000
मॅच्युरिटी वर्ष – 2044