• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप-राष्ट्रवादीत शिजतंय काय? गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर झळकला शरद पवार, अजित पवारांचा फोटो

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 17, 2023
in Uncategorized
0
भाजप-राष्ट्रवादीत शिजतंय काय? गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर झळकला शरद पवार, अजित पवारांचा फोटो
Spread the love

जळगाव: भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. पण काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने बॅनरबाजी केली आहे. काही कार्यकर्त्यांनी होर्डींग लावले आहेत. त्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या शुभेच्छा जाहिरातीची अधिक चर्चा होत आहे.

मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका दैनिकात महाजन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री सुरेश जैन यांचे फोटो आहेत. यात विशेष म्हणजे या जाहिरातीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही फोटो आहे. यात अजित पवार यांचा फोटो सर्वात मोठा छापण्यात आला आहे. आणि अजित पवारांच्या फोटोखाली ‘जिवाभावाचा माणूस’, असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याच जाहिरातीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो छापण्यात आला आहे. पवार-मोदींच्या फोटो खाली अजित पवार, फडणवीस आणि मंत्री महाजन यांचा तिघांचा एकत्रित फोटोही छापण्यता आला आहे.

मंत्री महाजन यांचे आवाहन

मंत्री गिरीश महाजन यांनी वाढदिवसानिमित्त एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात म्हटले की, “यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर, उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यामुळे यंदा माझ्या वाढदिवसाला कोणताही कार्यक्रम घेऊ नये, तसेच जाहिरातबाजी करू नये. राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, कुणाला काही कार्यक्रम करायचेच असतील तर रक्तदान संकलन करा. मी यंदाच्या वाढदिवसाला बाहेरगावी असलो तरी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे माझ्या सोबत कायम असतील. याच्या बळावरच मी आजवर वाटचाल केल्याचे गिरीश महाजन यांनी नमूद केलं आहे.

Previous Post

धावत्या रेल्वेत चढताना महिलेचा जीव वाचवला; समतोलच्या कार्यकर्त्यांचे प्रसंगावधान

Next Post

सातबारा उताऱ्यावर पीककर्जाचा बोजा लावण्यासाठी घेतली लाच, पाचोऱ्यात एकास अटक

Next Post
Breaking: धरणगावात लाचखोर नायब तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात; तालुक्यात एकच खळबळ

सातबारा उताऱ्यावर पीककर्जाचा बोजा लावण्यासाठी घेतली लाच, पाचोऱ्यात एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!