• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नदीत पोहताना तरुणाला आला फिट; गिरणा नदीत बुडून झाला मृत्यू

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 22, 2023
in Uncategorized
0
मोठी बातमी: खडकवासला धरणात नऊ मुली बुडाल्या तर चंद्रपुरात चार तरुणांचा बुडून मृत्यू
Spread the love

जळगाव : जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात पोहतांना फिट आल्याने तरूणाची पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू भूरा भिल (वय-३५) रा. पिंपळकोठा ता.एरंडोल जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

जळगाव तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, राजू भिल हा तरूण आपल्या परिवारासह पिंपळकोठा येथे वास्तव्याला होता. त्याला फिट येण्याचा आजार होता. दुपारी १ वाजता जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. नदीपात्राच्या पाण्यात पोहत असतांना त्याला अचानक फिट आले. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

अकस्मात मृत्यूची नोंद

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लिलाधर महाजन, नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ लिलाधर महाजन, नरेंद्र पाटील हे करीत आहे.

Previous Post

हवामान विभागाचा अलर्ट! राज्यात पुढील तीन दिवस महत्वाचे; मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता

Next Post

आगामी निवडणुकांमध्ये आमदारांचे “डॅमेज कंट्रोल” थांबणार तरी कसे ?

Next Post

आगामी निवडणुकांमध्ये आमदारांचे "डॅमेज कंट्रोल" थांबणार तरी कसे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!