• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे अहिंसा सदभावना यात्रेद्वारे विश्व अहिंसा दिवस साजरा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 3, 2023
in जळगाव
0
Spread the love

जळगाव प्रतिनिधी – लहान मुलं हे देशाचे भविष्य आहे. मुलांनी जिज्ञासा पुर्वक प्रश्न विचारून सुसंवाद घडवावा, त्यातुनच समाज घडेल. असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती अनुराधा शंकर यांनी केले. त्या गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित अहिंसा सद्भावना शांती यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.


महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंती निमित्त लालबहादूर शास्त्रीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अहिंसा सद्भावना शांती यात्रेची सुरवात झाली. यावेळी प्रमुख अतिथी मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती अनुराधा शंकर यांच्याहस्ते अहिंसा सदभावना यात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. माहेश्वरी, गांधीजींचे पणतु तुषार गांधी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, अशोक जैन, अनिल जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार लता सोनवणे, भरत अमळकर, माजी महापौर जयश्री महाजन, विष्णू भंगाळे, राधेश्याम चौधरी, अँड. रविंद्रभैय्या पाटील, अथांग जैन, सुरेश जैन, अब्दुल भाई, सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन, सौ. अंबिका जैन आदींसह शहरातील प्रशासकीय अधिकारी, जैन इरिगेशन मधील सहकारी, नागरीक व शहरातील हरिजन सेवक संघ कन्या छात्रालय, शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालय, नंदनीबाई माध्यमिक विद्यालय, ओरियन इंग्लिश मिडीअम स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेकंडरी, अनुभूती निवासी स्कूल, आदर्श सिंधी हायस्कूल, मनपा उर्दू माध्यमिक विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

यात्रेत भारत माता, महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कस्तुरबा गांधी, सरोजनी नायडू, अब्दुल कलाम यांची वेशषभूषा असलेली चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. ‘जय जवान जय किसान’, ‘महात्मा गांधीजी की जय’ चा नारा देत लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून शांती यात्रा निघून सरदार वल्लभभाई पटेल मनपा इमारत, पंडीत जवाहरलाल नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ. हेडगेवार चौक, नवीन बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रेचे समारंभात रूपांतर झाले.

श्रीमती अनुराधा शंकर यांनी आपल्या भाषणात मुलांशी संवाद साधताना गांधीजींविषयी रंजक गोष्टी सांगितल्या. महात्मा गांधीजींच्या विचारांची आवश्यकता विद्यार्थ्यांना आहे. कारण हेच मुलं भविष्यात समाज घडवतील. प्रश्न विचारु न देणाऱ्यांशी मैत्री करू नये. सर्वधर्म प्रार्थना आपण म्हणतो पण एकमेकांशी त्या प्रार्थनेप्रमाणे आचरण करतो का? हे स्वतः ला समजले पाहिजे. आपण लालबहादुर शास्त्री, महात्मा गांधीजी यांचे बुध्दी, युक्ती व शक्ती हे गुण आत्मसात करावे असेही त्या म्हणाल्यात.

लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुर्ष्पापण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वधर्म प्रार्थना होऊन ॲड. अच्युतराव अत्रे इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो…’ भजन गायन केले. प्रास्तविकेत गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गतवर्षातील उपक्रमांविषयी सौ.अंबिका जैन यांनी माहिती दिली. नॅशनल लिडरशिप कॅम्पमधील प्रतिनिधीं समवेत गांधीजींचे पणतु तुषार गांधी यांनी अहिंसेची शपथ दिली. पी. जी. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात पदव्या प्रदान केल्या गेल्या.

डॉ. विश्वास पाटील लिखीत ‘खानदेश में महात्मा गांधी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यात महात्मा गांधीजींविषयी कान्हदेशातील अनेक घटनांची नोंद ऐतिहासिक पुस्तकात आहे त्याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तुषार गांधी होते. आ. सुरेश भोळे, आ. लता सोनवणे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जैन इरिगेशनचे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, अनिल जैन, डॉ. सुदर्शन आयंगार, सौ. ज्योती जैन, भरत अमळकर, डॉ. विश्वास पाटील, फाऊंडेशनच्या रिसर्च डिन गीता धरमपाल, सौ. अंबिका जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपक चांदोरकर यांनी शेवटी राष्ट्रगीत म्हटले. सुत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी केले.
याच कार्यक्रमात गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल ही घोषित करण्यात आला. यात २१ जिल्ह्यातील १४५ स्पर्धक सहभागी झाले होते.
पहिला गट १ पुरस्कार विजेते.– मानसी गाडे- प्रथम, (शेवगाव, जि. नगर), गुंजन अहिरराव-द्वितीय, (धाडणे, जि. धुळे) हंसिका महाले, – तृतीय (भुसावल) तर उत्तेजनार्थ नेहा पाटील, (नंदुरबार), धनश्री पाटील, (तारखेडा, ता. पाचोरा जि. जळगाव)दुसऱ्या गटातील विजेते स्पर्धक– सृष्टी थोरात- प्रथम, (नंदुरबार), सृष्टी कुलकर्णी – द्वितीय (जळगाव), पियुष अहिरराव- तृतीय, (धाडणे, ता. साक्री जि. धुले) उत्तेजनार्थ पारितोषिक प्रणाली पाटील, (तारखेडा ता पाचोरा), पीयुष अहिरराव हे विजेते ठरले. त्यांना मान्यवराच्याहस्ते पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविले गेले.
चरखा जयंती निमित्त अखंड सूत कताई
महात्मा गांधींनी चरखा हे राजकीय मुक्तीसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरून, ‘प्राचीन कार्य नीतिमत्तेचे’ रूपक म्हणून आणि ब्रिटिश राजवटीला आर्थिक आणि सामाजिक प्रतिक्रियेचे प्रतीक म्हणून वापरले. महात्मा गांधींनी त्यांचा जन्मदिन चरखा जयंती म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन केले होते. त्याचे औचित्यासाधून बैलगाडीवर चरखाची मिरवणूकही यावेळी काढण्यात आली होती. तसेच कार्यक्रमस्थळी फाऊंडेशनचे काही सहकारी पुर्णवेळ सुतकताई करत होते. चरखा जयंती निमित्ताने गांधी तीर्थ येथे आज दिवसभर अखंड सूत कताई करण्यात आली.

Tags: #gandhi research foundation#jain irregationashok jaingandhi jayanti
Previous Post

गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेतून महात्मा गांधीजींना आदरांजली ; ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम प्रथम

Next Post

राहुल मिस्त्री युवा प्रतिष्ठान चा स्तुत्य उपक्रम

Next Post

राहुल मिस्त्री युवा प्रतिष्ठान चा स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!