• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार मंगेश चव्हाण यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटासह महाविकास आघाडीला दे धक्का…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 6, 2023
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

चाळीसगाव तालुक्यातील १२ पैकी १२ ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात…

राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे सह महाविकास आघाडीच्या दिग्गजांच्या पॅनलचा धुव्वा

खेडगाव ग्रामपंचायत सरपंच पदासह पूर्ण बहुमत भाजपाकडे

चाळीसगाव राजमुद्रा – आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड सुरु आहे. काल पार पडलेल्या ११ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून बिनविरोध झालेली १ ग्रामपंचायत सह १२ पैकी १२ ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासह शिवसेना उबाठा गट व काँग्रेस पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठ्या यशानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला व महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का देण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी गटनेते शशिकांत साळुंखे यांच्या खेडगाव गावातील पॅनलचा धुव्वा उडवत भाजपा पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार उषाबाई मरसाळे विजयी झाले आहेत तर सदस्य पदांवर देखील ११ पैकी ९ उमेदवार भाजपा पुरस्कृत पॅनलचे निवडून आल्याने भाजपचे निर्विवाद वर्चस्व खेडगाव ग्रामपंचायतीवर सिद्ध झाल आहे.

खेडगाव येथील पराभूत पॅनलचे नेतृत्व करणारे शशिकांत साळुंखे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जुने नेते असून गेली अनेक वर्ष जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीत त्यांचे वर्चस्व राहिले होते. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत त्यांच्या मुलाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते, त्यांनतर त्यांच्या होम पिचवर ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे.

खेडगाव येथील भाजपा पुरस्कृत पॅनलचे नेतृत्व भाजपचे अविनाशनाना चौधरी, रावसाहेब साळुंखे, के.बी.दादा साळुंखे, पांडुरंग महाजन, सुकलाल माळी, छोटू पाटील, यांनी केले होते. विशेष म्हणजे सदर पॅनलचा प्रचार शुभारंभ आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते नारळ फोडून करण्यात आला होता. त्यामुळे खेडगाव गावातील निवडणूक हायव्होल्टेज होणार असल्याच्या चर्चा सुरुवातीपासून होत्या.

Tags: #mangesh chavhanbjpchalhisgaongrampanchat niavdnukgrampanchayatmla chalhisgaon
Previous Post

ग्रामपंचायत निवडणुक: अटीतटीची लढत, भाजप विजयी ;  अरविंद देशमुख किंग मेकरच्या भूमिकेत

Next Post

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा, महाराष्ट्राच्या तायक्वॉदो खेळाडूंनी जिंकली १० पदके

Next Post

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा, महाराष्ट्राच्या तायक्वॉदो खेळाडूंनी जिंकली १० पदके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!