• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आत्महत्या मुक्त समाज विषयावर प्रबोधन ; रिफॉर्मेशन कपला जल्लोषात सुरुवात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 13, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा – मुस्लीम समाजातील युवकांना एकत्र करीत त्यांच्यातील खेळाडूवृत्तीला वाव देण्याच्या हेतूने प्रेरित रिफॉर्मेशन कपच्या दुसऱ्या पर्वाला शुक्रवारी युवा दिनाचे औचित्य साधत सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षी मिळालेल्या प्रतिसादानंतर यंदा देखील खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

मुस्लीम समाजातील ११ युवकांनी एकत्र येत गेल्यावर्षी युवकांना जोडण्यासाठी आणि समाज प्रबोधनाच्या हेतूने रिफॉर्मेशन कप या क्रिकेट सामन्याची संकल्पना मांडली होती. आयपीएल प्रमाणे खेळाडूंचा लिलाव आणि संघ प्रायोजकत्व अशी पद्धत असलेल्या स्पर्धेत दरवर्षी एक नवीन संकल्प ठेवत त्यावर प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी नशामुक्त समाज या विषयावर तर यंदा आत्महत्यामुक्त समाज या विषयावर प्रबोधन करण्यात येणार आहे.

युवा दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सकाळी शिवतीर्थ मैदानावर क्रीडा सामन्यांना सुरुवात झाली. स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले असून प्रत्येक संघाचे ३ सामने होणार आहेत. उत्कृष्ट प्रकाश यंत्रणा, खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी, आवाज आणि समालोचक, लाईव्ह स्ट्रिमिंग अशा विविध सुविधा स्पर्धेठिकाणी देण्यात येत आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचे अंतीम सामने रविवार दि.१४ रोजी खेळवले जाणार असून त्यानंतर पारितोषिक वितरण होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीतील रेहान सर, शारीक शेख, आसिफ मिर्झा, आसिफ देशमुख, जकी अहमद, आमिर शेख, आमिर गोल्डन, शोएब बागवान, अलफैज पटेल, शोएब खान, अजहर खान यांच्यासह इतर सदस्य परिश्रम घेत आहेत.

Tags: jalgaon cricketMuslim samaj
Previous Post

प्रशासनात जोरदार घडामोडी ; जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

बियाणी शैक्षणिक संस्था रडारवर ; ओपन स्पेस वर लावले स्वतःचे नाव ; शासनाची केली फसवणूक ?

Next Post

बियाणी शैक्षणिक संस्था रडारवर ; ओपन स्पेस वर लावले स्वतःचे नाव ; शासनाची केली फसवणूक ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!