• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी या ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Team Rajmudra by Team Rajmudra
March 28, 2024
in Uncategorized
0
Spread the love

मुंबई (राजमुद्रा):- महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट तयार होत आहे. पुन्हा राज्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे, राज्यभरातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असा अंदाज आहे.जस की आपणास ठाऊकच आहे की, 16 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची आणि गारपीटीची हजेरी पाहायला मिळाली होती. या कालावधीत झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पण, आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात दिवसाचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. काही ठिकाणी तर याहीपेक्षा अधिकचे तापमान पाहायला मिळतंय. यामुळे अंगाची अक्षरशा लाहीलाही होत आहे.

वाढत्या तापमानामुळे अनेक ठिकाणी उष्माघाताची प्रकरणे समोर येत आहेत. यामुळे नागरिकांना विशेष सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा या परिस्थितीत मात्र पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला आहे.
वादळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान होईल अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान आता आपण भारतीय हवामान विभागाने नेमका काय हवामान अंदाज दिला आहे, राज्यातील कोणत्या भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय म्हणतय भारतीय हवामान विभाग ?

इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट अर्थातच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. विदर्भ विभागातील अकोल्यात 42.8 अंश सेल्सिअस, उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव मध्ये 42 अंश सेल्सिअस तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगावात 41 अंश सेल्सिअस पर्यंतचा तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मार्च महिना आता जवळपास समाप्तीकडे आहे आणि तापमानाने देखील नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. या तापमान वाढीमुळे मात्र अंगाची अक्षरशः लाहिलाही होतआहे. परंतु राज्यातील काही भागांमधील नागरिकांना या वाढत्या तापमानापासून दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विदर्भ विभागात भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज दिला आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, 30 आणि 31 मार्च रोजी मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

31 मार्च रोजी विदर्भ विभागातील अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपुर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली व नागपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळे या सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहणे अपेक्षित असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Previous Post

अमरावतीतून अखेर तिकीट, नवनीत राणांचा प्रचार करणार? काय म्हणाले बच्चू कडू बघा ….

Next Post

जगातील सर्वात पक्षाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण काय म्हणतायं बघा “निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत”

Next Post

जगातील सर्वात पक्षाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण काय म्हणतायं बघा "निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!