• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा

Team Rajmudra by Team Rajmudra
March 29, 2024
in Uncategorized
0
Spread the love

पारनेर ( राजमुद्रा):-      राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा देत नगर दक्षिणमधून लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी आपण राजीनामा देतोय याचे वाईट वाटतेय, त्याबद्दल आपण माफी मागत असल्याचेही ते म्हणाले. पण आपल्याला लोकसभेत जावून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मांडायचे असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नगर दक्षिणमधून ते  लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी तुमचे नुकसान होऊ देणार नाही. मी त्याची भरपाई करणार असे कार्यकर्त्यांना म्हणताना अक्षरश: रडू कोसळले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या वयात आपण त्रास दिला. आता त्यांच्या नेतृत्वाखाली आपण लोकसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू असेही त्यांनी सांगितले. आपल्यावर आज ही वेळ का आणि कोणी आणली याबाबतही कधीतरी बोलू असेही ते म्हणाले. आमदारकीचे अनेक महिने शिल्लक असताना आपल्याला राजीनामा द्यावा लागत आहे. कायद्यात अडकू नये म्हणून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात अधिकृत प्रवेश केला. त्यांनी तुतारी चिन्ह असलेल उपरणे खांद्यावर घेतले आणि तुतारी चिन्हाचा बोर्ड हातात झळकावला, त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रतिसाद दिला. मी आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. नंतर कोविड आला. काही जणांनी मला विचारले तुम्ही गुवाहाटीला गेले का ? छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला. मी आमदार असो किंवा नसो अजित पवार राजकारणात राहिले पाहीजेत अशी भूमिका त्यांनी मांडली.

Previous Post

शाहू महाराज, आंबेडकर यांना पाठिंबा, पण 9 मतदारसंघात उमेदवार; प्रकाश शेंडगे यांची मोठी खेळी

Next Post

चाळीसगाव शहरातील कुख्यात आरोपी दोन्ही बाप-लेक सहा महिन्यासाठी जळगाव जिल्ह्यातुन हद्दपार…

Next Post

चाळीसगाव शहरातील कुख्यात आरोपी दोन्ही बाप-लेक सहा महिन्यासाठी जळगाव जिल्ह्यातुन हद्दपार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!