• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अबब.. सुवर्णनगरी जळगाव येथे सोन्याच्या दराने गाठला उच्चांक

Team Rajmudra by Team Rajmudra
April 5, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव (राजमुद्रा) : – नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन-चार दिवसांतच सोन्याने यापूर्वीचे सर्व उच्चांक मोडले असून, चांदीच्या दरानेही विक्रमी पातळी गाठली आहे. गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवर आला असताना सोन्याची प्रतितोळा ७५ हजारांकडे वाटचाल सुरू आहे.

जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थिती, सोन्याला वाढलेल्या मागणीसह त्यात वाढलेली गुंतवणूक ही दरवाढीची कारणे सराफ व्यावसायिकांकडून सांगितली जातात.

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच अर्थात एक एप्रिलला सोने-चांदीतील दरवाढ कायम राहून सोन्याच्या दरात एकाच दिवसात ९०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याने प्रतितोळा दराने ६९ हजार ४०० रुपयांपर्यंत पातळी गाठून प्रतितोळा दर जीएसटीसह ७१ हजार ४८२ रुपयांपर्यंत पोहचले होते. एक मार्चला हेच दर ६३ हजार १०० रुपये होते. चांदीचे दर एक एप्रिलला प्रतिकिलो ७६ हजार रुपये होते. सराफ बाजारात सोने आणि चांदीची घोडदौड सुरूच राहिल्यामुळे ग्राहकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. एप्रिलच्या चार दिवसांतच सोने दरात प्रतितोळा ६०० रुपये, तर चांदी दरात प्रतिकिलो दोन हजारांची वाढ झाली. शुक्रवारी सोने प्रतितोळा दर ७२ हजारांपर्यंत, तर चांदी प्रतिकिलो दर ८० हजारांपर्यंत होते.

दर वाढले असले तरी सद्यःस्थितीत लग्नसराई व गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणार्‍या खरेदीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे सराफ व्यावसायिक कपिल खोंडे यांचे म्हणणे आहे. गुंतवणूक केलेल्या सर्वसामान्यांकडून सोने मोडतानाही दिसून येत असून, त्याचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

जागतिक स्तरावर युक्रेन, रशिरा, इराक, इराण, इस्त्राईल यांसह इतर देशांत युद्धजन्य परिस्थिती आणि सोन्याला असलेली मागणी, सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक, अशी दरवाढ होण्याची कारणे आहेत. सोन्या-चांदीतील दरवाढ आगामी काळातही कायम राहणार असून, सोने प्रतितोळा दर ७५ ते ७६ हजारांपर्यंत पातळी गाठेल. दर कमी झालेच तर फक्त २०० ते ५०० रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. अशी माहिती जळगाव सराफ बाजार संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार ललवाणी यांनी दिली आहे.

 

 

Previous Post

मा.खा. उन्मेष पाटील कडाडले, “दादागिरी व द्वेषाचे राजकारण खपवून घेणार नाही”

Next Post

लोकसभेत मविआ 48 पैकी ‘इतक्या’ जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित

Next Post

लोकसभेत मविआ 48 पैकी 'इतक्या' जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!