• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय? महायुती संदर्भात आज उघडणार का पत्ते..?

Team Rajmudra by Team Rajmudra
April 9, 2024
in Uncategorized
0
Spread the love

 दादर (राजमुद्रा) : –    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढी पाडवा मेळावा पार पडणार आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भव्य सभा होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. राजकारणाची ज्यांना आवड आहे ते, राजकीय विश्लेषक आणि महाराष्ट्र सैनिकांना आज राज ठाकरे काय बोलणार? त्याची उत्सुक्ता आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीच वार वाहत आहे. महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात झाली आहे. या सगळ्या राजकीय धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. मनसे लोकसभा निवडणूक 2024 लढवणार का? मनसे, शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी होणार का? मनसे बाहेर राहून महायुतीला पाठिंबा देणार का? मनसे महायुतीमध्ये गेल्यास किती जागा मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत. राज ठाकरे यांच्या वकृत्व कौशल्याबद्दल प्रश्नच नाही. अगदी काही क्षणात समोरच्याला जिंकून घेण्याच कसब असलेला हा नेता आहे.

सध्या महाराष्ट्रात राजू पाटील यांच्या रुपाने मनसेचा फक्त एकमेव आमदार आहे. पण म्हणून मनसेला जनाधार नाही, असं म्हणता येणार नाही. कारण सभेल जमणारी गर्दी त्यातून बरच काही स्पष्ट होतं. मनसेला मानणारा सुद्धा एक वर्ग आहे, भले तो अल्प असेल, पण तो आहे. म्हणूनच राज ठाकरे यांची दखल महायुतीला घ्यावी लागली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये काय बोलणी झाली? ते अजून स्पष्ट झालेलं नाहीय. त्याची माहिती आज मिळू शकते.

म्हणून आजचा गुढी पाडवा मेळावा खास

अमित शाह यांची भेट घेऊन राज ठाकरे मुंबईत परतले. त्यानंतर वांद्र्याच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांची तासभर चर्चा झाली. त्यानंतर मनसे महायुतीमध्ये येत्या एक-दोन दिवसात सहभागी होणार अशी चर्चा सुरु झालेली. पण आता या सगळ्यामध्ये मनसे कुठेच दिसत नाहीय. त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार की, लोकसभा निवडणूक लढवणार नाही? असा प्रश्न मनसैनिकांच्या मनात आहे. त्याच उत्तर आज मिळू शकतं. अन्य गुढी पाडवा मेळाव्यांपेक्षा आजचा गुढी पाडवा मेळावा जास्त खास आहे.

Previous Post

लोकसभा निवडणूक कामकाजातुन दिव्यांग,गरोदर व प्रसुती रजेवरील महीलांना सुट दयावी…!

Next Post

काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार, धडधडणारी तोफ शिंदे गटात; काँग्रेसच्या बड्या नेत्याने पक्ष सोडला

Next Post

काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार, धडधडणारी तोफ शिंदे गटात; काँग्रेसच्या बड्या नेत्याने पक्ष सोडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!