• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

Team Rajmudra by Team Rajmudra
April 18, 2024
in Uncategorized
0
Spread the love

मुंबई ( राजमुद्रा) : –राज्यासह देशभरात उद्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशात शिवसेना (शिंदे गट) यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

राज्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. 437/6/INST/2015-CCS दि 29.12.2015 नुसार, निवडणूक प्रचारासाठी सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांच्या मालमत्तांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र सर्व राज्यांचे कॅबिनेट सचिव, मुख्य सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उद्देशून पाठवलेले आहे. बंदी असतानाही एसटीच्या अधिकाऱ्यांनी 1000 हून अधिक बसेस शिवसेना उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी अवैधपणे वापरास परवानगी दिली आहे. एसटी महामंडळाच्या या बसेसवर शिवसेना बॅनर लावून निवडणूक प्रचार करत आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह स्पष्टपणे दाखवण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे हे कृत्य केवळ आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन करत नाही तर निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षता आणि अखंडतेला बाधा आणणारे आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

Previous Post

भाजपा आमदाराचं खळबळजनक वक्तव्य, “मंत्रालयातील तिजोरीचा चावीवाला आपला दोस्त, पाहिजे तेव्हा.”, फडणवीसांचाही उल्लेख

Next Post

वर्गणी दिली नाही म्हणुन तरुणावर जिवघेणा चाकुहल्ला….!

Next Post

वर्गणी दिली नाही म्हणुन तरुणावर जिवघेणा चाकुहल्ला....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!