• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कडक उन्हात प्रचार तापला, उमेदवारासह कार्यकर्ते घामाघुम….

Team Rajmudra by Team Rajmudra
April 30, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव / रावेर (राजमुद्रा)- : कडक उन्हाळ्यात तापमान 42 अंशांवर गेलेले असतानाही जळगाव / रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार आणि श्रीराम पाटील यांच्या प्रचारातील उत्साह तसूभरही कमी झाला नसल्याचे आज (सोमवारी) पहायला मिळाले.

रणरणत्या उन्हात करण पवार यांनी जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मधून, तर श्रीराम पाटील यांनी चोपडा तालुक्यातील तब्बल १५ गावांपर्यंत जाऊन मतदारांशी संपर्क साधला.

करण पाटील यांच्या उपस्थितीत निघालेली महाविकास आघाडीचे प्रचार फेरी राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसर, महावीर नगर, राधाकृष्ण नगर, भारतनगर, इंद्रप्रस्थ नगर, श्री लक्ष्मी नगर, छत्रपती शिवाजी नगर, खडके चाळ मार्गे गेंदालाल मिल आदी भागातून काढण्यात आली. रेल्वे स्टेशनजवळील मौला अली मुश्किल कुशा बाबा दर्गा येथे प्रार्थना करून या प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला.

या प्रचार रॅलीत महाविकासआघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजन, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, राष्ट्रवादी कॉंगेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, डेबुजी फोर्सचे अध्यक्ष सागर सपके, माजी नगरसेवक सुनील माळी, पार्वताताई भिल, प्रा. अस्मिता पाटील, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमृता नेरकर, शहराध्यक्ष दीपक माने, सचिव राजू निकम, उपाध्यक्ष सिमा बिर्ला, कोषाध्यक्ष सुनील निकम, सहसचिव सागर निकम, निर्मला निकम, शिवसेनेचे विभाग प्रमुख अण्णा भोईटे, ज्येष्ठ नेते सुभाषजी सांखला, निलेश मिश्रा, विजय कोळी, शरद बारी, रितेश बाविस्कर, माजी नगरसेवक इब्राहिम पटेल, शकील बागवान, राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, रहीम तडवी, गोकुळ चव्हाण, माजी नगरसेवक राजू मोरे, शहर उपाध्यक्ष किरण राजपूत, श्रीकांत आमले, नीता सांगोळे, छाया कोळी, योगिता शुक्ल, अमीना तडवी, मीना जावळे, सरिता नेरकर यांसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

श्रीराम पाटील यांनी चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथील प्रकाशगड श्री धुनीवाले दादाजी यांच्या दरबार दर्शनाने चोपडा तालुक्यात प्रचाराला सुरूवात करण्यात आली. यावेळी त्यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या गावात जावून नागरीकांशी संवाद साधल्याचे पहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, सूतगिरणीचे संचालक भाऊसाहेब पाटील , राजेंद्र पाटील, माजी सभापती डी पी साळुंखे, डॉ. चंद्रकांत बारेला, ललित बागुल, तुकाराम पाटील, नंदू आबा पाटील, दीपक आधार, देविदास कोळी, सुनील पाटील, राजेंद्र भाटिया, जगत पाटील, गोपाल धनगर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

रेल्वे रुळावर आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे अवाहन

Next Post

त्या ५०० वर अप्रेटींसधारकांना मिळाला न्याय !,रक्षा खडसें बाबात कृतज्ञता व्यक्त..

Next Post

त्या ५०० वर अप्रेटींसधारकांना मिळाला न्याय !,रक्षा खडसें बाबात कृतज्ञता व्यक्त..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!