• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर, दोन दिवसात मान्सुन महाराष्ट्रात पोहचणार

Team Rajmudra by Team Rajmudra
June 2, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव (राजमुद्रा)२ जून २०२४ । उष्णतेच्या झळांनी हैराण झालेल्यांसाठी आणि शेतीची मशागत करुन आता वरुणराजाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. ३० मे रोजी केरळात दाखल झालेल्या मान्सूनचे महाराष्ट्रातील लोकांना वेध लागले असून अशातच येत्या मंगळवारी ४ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली.
तसेच जळगावात आजपासून सात दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी उष्णता अधिक वाढत असल्याने अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलं आहे. अशातच वेळेआधी केरळात पोहोचलेला मान्सून महाराष्ट्र्रात कधी दाखल होईल याची उत्सुकता सगळ्यांना लागली. यंदा ३० मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला. यांनतर आधी कोकणात येतो. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास आठ ते दहा दिवस लागतात. म्हणजेच आठ ते दहा तारखेपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत मान्सून दाखल होणार आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

सध्या पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मान्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यात ३ जून रोजी, तळ कोकणात ४ जून रोजी तर पुण्यात ६ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर खान्देशात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांत आज आणि उद्या उष्ण आणि दमट वातावरण राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा इशारा :
तर दुसरीकडे दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जळगाव कसे राहणार हवामान :
दरम्यान, गेल्या आठवड्यात ४५ अंशाचा टप्पा गाठणाऱ्या तापमानात मोठी घट झाली असून शनिवारी जळगावचे तापमान ४०.९ इतके होते. आज रविवारपासून पुढील सात दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. हवामान अभ्यासकांनी ४ ते ६ जून या तीन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.तर जळगाव जिल्ह्यात १५ जूननंतर नियमित मान्सून येईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Previous Post

नताशाला 70 टक्के संपत्ती दिल्यावर हार्दिकचं काय होणार?; एकूण संपत्ती आहे तरी किती?

Next Post

४ जुनच्या निकालानंतर भाजप संघाटनात्माक बदल करणार???

Next Post

४ जुनच्या निकालानंतर भाजप संघाटनात्माक बदल करणार???

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!