• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगावचा एकदंत महोत्सवात तरुणाईला संत साहित्याचा लळा लावण्याचा अनोखा प्रयोग

Team Rajmudra by Team Rajmudra
September 9, 2024
in Uncategorized
0
चाळीसगावचा एकदंत महोत्सवात तरुणाईला संत साहित्याचा लळा लावण्याचा अनोखा प्रयोग
Spread the love

राजमुद्रा : दरवर्षी मोठ्या उत्साहात एकदंत महोत्सव आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून साजरा साजरा होत असतो .
5 वर्षांपूर्वी एकदंत महोत्सवाची संकल्पना मांडण्यात आली. आणि आज या उत्सवाला व्यापक व मोठे स्वरूप प्राप्त झालेले पाहायला मिळत आहे. या महोस्तवात अभंगाच्या मूळ रचनांना धक्का न लावता त्याला आधुनिक संगीताचा साज देवून नव्याने अभंग सादर करण्याचा नवीनच प्रयोग ‘अभंग रिपोस्ट’ च्या तरुणांनी सादर केला. अभंग रिपोस्टच्या बँडने तरुणाई थिरकली.

आजच्या तरुणांना जे संगीत माध्यम आवडतं त्या माध्यमातून संतांचे अभंग त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अभंग रिपोस्टच्या माध्यमातून होत आहे. चाळीसगावची जनता हि वारकरी जनता आहे. या वारकरी जनतेला नव्या पद्धतीने मांडलेले अभंग नक्कीच आवडतील असा विश्वास आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी मनोगतातून व्यक्त केला. .
. दरवर्षी नवीन थीमवर एकदंत महोत्सव साजरा होत असतो. यावर्षी राम मंदिराची प्रतिकृती साकार करून प्रभू श्री रामांना वंदन करणारी थीम साकारली आहे. या मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.

सोशल मिडीयावर धुमाकूळ घालणार बँड म्हणजे अभंग रिपोस्ट. दुष्यंत देवरुखकर, स्वप्निल तर्फे, अजय वाव्हळ, प्रतिष म्हस्के, पियुष आचार्य आणि विराज आचार्य या 6 तरुणांनी ही संकल्पना मांडली. विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या या बँडने नंतर व्हिडीओज बनवून युट्यूबवर टाकले. त्यालाही हजारोंनी लाइक्स मिळाले आहेत.अभंग, भजन, बालगीतं, शिवतांडव स्तोत्र यांना पाश्चात्य संगीताचा साज चढवत त्यांनी हे सादर करायला सुरूवात केली

. ‘मलबार हिल महोत्सवा’ पासून सुरु झालेला हा प्रवास्र चाळीसगावच्या एकदंत महोत्सवापर्यंत येवून पोहोचलेला आहे. बेस गिटार, अॅकॉस्टिक गिटार तबला, ड्रम्स, पियानो यासारख्या वाद्यांचा त्यामध्ये वापर होतो.

आपल्या मातीत जन्मलेल्या संत मंडळींनी केलेल्या उपदेशांचा खरा अर्थ ‘अभंग रीपोस्ट’मुळे नव्या तरुणाईला उमगत आहे.
संतांचा उपदेश आजच्या तरुणाईपर्यंत त्यांना आवडेल, रूचेल, पटेल अशा मार्गानं पोहोचवणं हा आमचा यामागचा हेतू आहे. अशा भव्य वातावरणात अनोखा प्रयोग सादर करण्यात आला

Tags: jalgaon city
Previous Post

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय व नेत्र ज्योती हॉस्पिटलच्यावतीने मोफत डोळे तपासणी शिबिर

Next Post

चाळीसगाव मध्ये दोन कट्टर वैरी मित्र विधानसभेच्या रिंगणात

Next Post
चाळीसगाव मध्ये दोन कट्टर वैरी मित्र विधानसभेच्या रिंगणात

चाळीसगाव मध्ये दोन कट्टर वैरी मित्र विधानसभेच्या रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!