• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तामिळनाडू मध्ये “खेलो इंडिया” लीग तायक्वांदो स्पर्धा संपन्न

Team Rajmudra by Team Rajmudra
September 18, 2024
in जळगाव
0
तामिळनाडू मध्ये “खेलो इंडिया” लीग तायक्वांदो स्पर्धा संपन्न
Spread the love

राजमुद्रा : तामिळनाडू मध्ये भारत सरकारच्या मान्यतेने पार पडलेल्या खेलो इंडिया वुमेन्स लीग तायक्वांदो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र मुलींनी १० सुवर्णपदके जिंकली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली.

तायक्वांदो हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असून शालेय क्रीडा स्पर्धा, विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पोलीस क्रीडा स्पर्धा अशा शासकीय स्पर्धांसोबतच आता “अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग” मध्येही तायक्वांदो खेळाचा मागील दोन वर्षीपासून समावेश झाला आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या अधिकृत राष्ट्रीय संघटनेकडे या ‘खेलो इंडिया’ तायक्वांदो स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी शासनाकडून देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील खेळाडूंनी नेहमीच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. महाराष्ट्र संघातील मुलींनी खेलो इंडिया वुमन्स स्पर्धेत वरिष्ठ गटामध्ये साक्षी पाटील, श्रुतिका टकले व नयन बारगजे यांनी तीन सुवर्णपदके पटकावली. ज्युनिअर गटात सिद्धी बेंडाळे ,श्रद्धा वाळकेरकर यांनी दोन सुवर्ण तर कॅडेट गटात कार्तिकी मिसाळ, त्रिषा मयेकर, रिया मयेकर यांनी तीन सुवर्णपदके जिंकली. जुनिअर वैयक्तिक गटात साईनी रावत व सिनिअर वैयक्तिक गटात वसुंधरा चेढे यांनी पुमसे प्रकारामध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. १० खेळाडूंनी या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धेत प्रवीण सोनकुल (पुणे) यांनी महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट काम केले.

खेलो इंडिया स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घारगे, सतीश खेमस्कर आदींनी कौतूक केले आहे.

Tags: jalgaon cityjalgaon jilhamaharashtra
Previous Post

महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच ; कोणाची वर्णी लागणार ?

Next Post

भाजपा खासदार अनिल बोंडेंना अटक करण्याची यशोमती ठाकूरांची मागणी .

Next Post
भाजपा खासदार अनिल बोंडेंना अटक करण्याची यशोमती ठाकूरांची मागणी .

भाजपा खासदार अनिल बोंडेंना अटक करण्याची यशोमती ठाकूरांची मागणी .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!