• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा खासदार अनिल बोंडेंना अटक करण्याची यशोमती ठाकूरांची मागणी .

Team Rajmudra by Team Rajmudra
September 18, 2024
in राजकीय
0
भाजपा खासदार अनिल बोंडेंना अटक करण्याची यशोमती ठाकूरांची मागणी .
Spread the love

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून अशातच आता भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी(Rahul Gandhi )यांचे बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.त्यांच्या या वक्तव्यावर आता माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत अनिल बोंडेंच्या वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अनिल बोंडे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.काँग्रेसच्या मागणीची दखल घेऊन पोलीसांनी खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात कलम १९२, ३५१(२) आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि दंगली भडकवण्याचा अनिल बोंडे यांचा प्रयत्न आहे, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत कारवाई करण्यासाठी अमरावतीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अनिल बोंडेंवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना गराडा घालण्यात आला. अनिल बोंडे हे गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, काँग्रेसच्या नेत्यांविरोधात हल्ले व्हावेत, असा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचा तात्काळ अटक करावी, असे ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.

यावेळी माजी मंत्री आमदार ॲड.यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष बबलु शेखावत,प्रवक्ते मिलींद चिमोटे, हरीष मोरे, हरीभाऊ मोहोड, भैय्या पवार, प्रविण मनोहर, अमित गावंडे, वैभव देशमुख, शैलेष काळबांडे, जयश्री वानखडे, अंजली ठाकरे, शोभा शिंदे, बंडु हिवसे, राजु बोडखे यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: rahul gandhiyashomati thakur
Previous Post

तामिळनाडू मध्ये “खेलो इंडिया” लीग तायक्वांदो स्पर्धा संपन्न

Next Post

मोदी सरकारचा निर्णय ; ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला मंजुरी

Next Post
मोदी सरकारचा निर्णय ; ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला मंजुरी

मोदी सरकारचा निर्णय ; 'एक देश एक निवडणूक' प्रस्तावाला मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!