• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा ; आमदार मंगेश चव्हानांचा माइल स्टोन

Team Rajmudra by Team Rajmudra
September 24, 2024
in Uncategorized
0
चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा ; आमदार मंगेश चव्हानांचा माइल स्टोन
Spread the love

राजमुद्रा : चाळीसगाव जिल्हानिर्मितीच्या दृष्टीने पाऊल पडले असून आमदार मंगेश चव्हाण यांनी आज वरचा हा माईल स्टोन निर्णय घेतला आहे.तालुक्याचा सर्वांगिण विकास करतांना दूरदृष्टी ठेवत जनतेला जळगांव येथे 100 ते 150 किलोमिटर जाण्या येण्याच्या होणाऱ्या त्रासाची जाणीव असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती, व अनुषंगाने आज प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिल्याने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे.

चाळीसगाव तालुका भौगोलिक दृष्ट्या, लोकसंख्या तसेच प्रशासकीय दृष्ट्या जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका आहे. त्याकरिता विविध शासकीय विभागांनी त्यांचे जिल्हास्तरीय उप कार्यालय चाळीसगाव येथे सुरू केलेले आहेत. पोलीस विभागाचे देखील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय चाळीसगाव येथे कार्यरत आहे. परिवहन विभागाने देखील उप प्रादेशिक कार्यालय सुरू आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय देखील मंजूर करण्यात आलेले आहे. मात्र जळगाव हे मुख्यालय असुन जळगाव चाळीसगाव अंतर शंभर किलोमीटर हून अधिक आहे. तसेच तालुक्यातील खेडे पाडे वस्ती पासून जिल्ह्याचे अंतर दीडशे किलोमीटर पेक्षा अधिक आहे. त्यामुळे जमिनी संदर्भात अपील, तक्रारी व इतर न्यायालयीन न्याय निवाडे करण्यासाठी जळगाव येथे ये-जा करणे तालुक्यातील जनतेसाठी सोयीस्कर नाही, याकरिता चाळीसगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणे अत्यंत आवश्यक असून जनतेच्या सोयीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे जनतेला येणाऱ्या श्रम व पैशाची बचत होणार आहे व जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील प्रशासकीय कामकाजाचा ताण देखील काही प्रमाणात कमी होणार आहे असे पत्र आमदार चव्हाण यांनी मुंबई येथे मंत्रालयात दिले होते

त्या अनुषंगाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ दाखल करण्याचे आदेश दिले असून शासन प्रस्ताव मंजूर होताच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Tags: jalgaon cityjalgaon jilha
Previous Post

चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा ; आमदार मंगेश चव्हानांचा माइल स्टोन

Next Post

विधानसभेसाठी अजित पवार गट ॲक्शन मोडवर ; मध्यरात्री देवगिरीवर खलबत

Next Post
विधानसभेसाठी अजित पवार गट ॲक्शन मोडवर ; मध्यरात्री देवगिरीवर खलबत

विधानसभेसाठी अजित पवार गट ॲक्शन मोडवर ; मध्यरात्री देवगिरीवर खलबत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!