• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपची रणनीती ठरली ; तीन नेत्यांच्या नेतृत्वात भाजप विधानसभा लढवणार

Team Rajmudra by Team Rajmudra
September 24, 2024
in राजकीय
0
भाजपची रणनीती ठरली ; तीन नेत्यांच्या नेतृत्वात भाजप विधानसभा लढवणार
Spread the love

राजमुद्रा : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे . यासाठी भाजपची रणनीती ठरली असून आता भाजप महाराष्ट्रात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे अशा सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार आहे . दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नागपुरात झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना पत्रक वाटण्यात आले आहेत. त्यात अमित शाहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या मार्गदर्शनात आपल्याला पूर्ण क्षमतेने विधानसभा निवडणुकांचा सामना करायचा आहे असं उल्लेख करण्यात आलं आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे .

विधानसभा निवडणुकीत महिला व तरुणांच्या मतांवर भाजपचे लक्ष असणार आहे. भाजप कोअर कमिटी बैठकीत युवा मोर्चा व महिला मोर्चांवर विशेष जबाबदारी असणार आहे. तरुण व महिलांची मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्याची व्यूहरचना आहे. लाडकी बहीण व लाडका भाऊ योजनेचे लाभार्थी वाढवण्यासाठी भर दिला जाणार आहे. तरुण आणि महिलांसाठी असलेल्या योजनांचा प्रत्येक आठवड्यात आढावा घेतला जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकत नाही. तोवर कोणीही थकणार नाही, थांबणार नाही, विश्रांती घेणार नाही… आता सर्वांचा एकच लक्ष्य आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक…. असा उल्लेखही या पत्रकात करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात परीक्षेच्या काळात काही लोक आपल्याला चक्रव्युहात अडकवू पाहत आहे. मात्र आपल्याला तो चक्रव्यूह भेदायचा आहे असा कानमंत्र ही कार्यकर्त्यांना या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुका संदर्भात काही सूचना आणि नियोजन बद्दलचा मार्गदर्शन ही कार्यकर्त्यांना लेखी स्वरुपात देण्यात आला आहे.

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakrebjpmaharashtra
Previous Post

रश्मी बर्वेना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय अवैध

Next Post

बालरंगभूमी परिषदेच्या ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

Next Post
बालरंगभूमी परिषदेच्या ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

बालरंगभूमी परिषदेच्या ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!