• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव महानगरपालिका आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात

Team Rajmudra by Team Rajmudra
September 25, 2024
in जळगाव
0
जळगाव महानगरपालिका आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात
Spread the love

राजमुद्रा : जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनुभूती स्कूल द्वारे सहआयोजित जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ मधील १४, १७ आणि १९ वर्षाआतील गटामधील मुलं व मुलींची बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्यात. अनुभूती निवासी स्कूल येथील बॅडमिंटन हॉल येथे १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा झाली.

या स्पर्धेत शहरातील शाळांमधील १४, १७, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या २० संघांचा समावेश होता. या स्पर्धेत ५० संघांचे २५० खेळाडूंचा सहभाग नोंदविला. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लि. तर्फे क्रमश: गोल्ड, सिल्वर आणि कास्य पदक पारितोषिक म्हणून देण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडासमन्वयक रवींद्र धर्माधिकारी, अनुभूती निवासी स्कूल शाळेचे व्यवस्थापक विक्रांत जाधव, भिकन खंबायत, जैन स्पोर्ट्स अॅकडमी फुटबॉलचे प्रशिक्षक मोहसीन व मुख्य पंच दीपिका ठाकूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित गोल्ड, सिल्वर आणि कास्य पदक देण्यात आले. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले.

या स्पर्धेतील १४ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय क्रमांक – पोदार इंटरनेशनल स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल यांचा आला. तर १४ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – महाराणा प्रताप हायस्कूल, द्वितीय क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट लॉरेन्स कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल यांचा आला.

तसेच १७ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – ओरियन स्कूल (स्टेट बोर्ड), द्वितीय क्रमांक – एम. जे. कॉलेज, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल यांचा आला. तर १७ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय क्रमांक – सेंट लॉरेन्स कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल यांचा आला.

दरम्यान १९ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, द्वितीय क्रमांक – एम. जे. कॉलेज, तृतीय क्रमांक – बबन बाहेती महाविद्यालय यांचा आला. तर १९ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – एम. जे. कॉलेज, द्वितीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – नूतन मराठा महाविद्यालय यांनी क्रमांक पटकवला.

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून दीपिका ठाकूर व पंच म्हणून नमन जैन, ईशांत साळी, रजत पटेल, फाल्गुन पाटील, शांतनू फालक, संस्कार, अंकित कोळी, देवेंद्र कोळी, अनामय जोशी, फाल्गुनी पवार, तेजश्री शुक्ल, हमजा खान, मिहिर कुलकर्णी, रीत नाथांनी, शुभम चांदसरकर, करण पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किशोरसिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनात विकास बारी, शुभम पाटील, पूनम ठाकूर, राखी ठाकूर, जाझीब शेख, मशरुख शेख यांनी परिश्रम घेतले. सहप्रशिक्षक दिपिका ठाकुर यांनी आभार मानले.

Tags: #jalgaon rajmudra darpanjalgaon cityjalgaon jilhamaharashtra
Previous Post

बालरंगभूमी परिषदेच्या ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

Next Post

भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल ; अशोक जैन

Next Post
भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल ; अशोक जैन

भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल ; अशोक जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!