• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी देवयानी कोल्हे, उपाध्यक्षपदी हेमलता पाटील यांची निवड

Team Rajmudra by Team Rajmudra
September 26, 2024
in जळगाव
0
अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी देवयानी कोल्हे, उपाध्यक्षपदी हेमलता पाटील यांची निवड
Spread the love

राजमुद्रा : श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव निमित्त संस्थापक अध्यक्ष सुनील (बंटी) भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली असून त्यात या वर्षीची महिला मंडळाची कार्यकारिणी व समित्यांची स्थापना करण्यात आली. या महिला मंडळाच्या अध्यक्षपदी देवयानी मुविकोराज कोल्हे यांची तर उपाध्यक्षपदी हेमलता मयूर पाटील यांची निवड करण्यात आली.

श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनचा दुर्गोत्सव मागील 12 वर्षांपासून सामाजिक जनजागृतीच्या अनुषंगाने देखाव्यांचे सादरीकरण करीत असते त्यात मागील वर्षी रेणुका मातेचे माहूर गडाची प्रतिकृती देखाव्यासाठी गौरविण्यात आले होते. तसेच, मंडळातर्फे दुर्गोत्सव मध्ये अत्यंत प्रिय असलेला गरबा, दांडिया आणि दशमा दरवर्षी आयोजित केला जातो तसेच विविध भागांतून निर्माल्य संकलनाचे काम करण्यात येते. त्याचप्रमाणे आतापर्यंत विविध प्रकारचे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक देखावे सादर केले असून, त्यातून समाजप्रबोधनाचे कार्य केले जाते.

यावर्षी केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती अती प्राचीन कालीन देवाधी देव महादेव भगवानचे केदारनाथ मंदिर पवित्र हिंदू धर्माची वास्तूकला उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या मंदिराची प्रतिकृती श्री अष्टभुजा मल्टिपर्पज फाऊंडेशन तर्फे ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड येथे उभारण्यात येणार आहे.

केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हे आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते. मंदिराची प्रतिकृती श्री अष्टभुजा मल्टिपर्पज फाऊंडेशन तर्फे ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड येथे उभारण्यात येत असून सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.

तसेच झालेल्या बैठकीत श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे श्री अष्टभुजा दुर्गोत्सव महिला मंडळ स्थापन करण्यात आले

मंडळाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
सल्लागार समिती- मनीषा खडके, नीलिमा वारके, प्रणाली चौधरी.

अध्यक्ष- देवयानी मुविकोराज कोल्हे
उपाध्यक्ष- हेमलता मयूर पाटील
कोशाध्यक्ष- रोशनी अक्षय खडके
कार्याध्यक्ष- करिश्मा सूरज बोरोले,
सह कार्याध्यक्ष- नेहा संजय पाटील, मीनल निलेश कोल्हे
सदस्यांमध्ये सारिका अत्तरदे, कीर्ती पाटील, गौरी खडके, श्रद्धा आत्तरदे, दिपा कोल्हे, दिक्षा , विशाखा खडके, दिपाली चौधरी, श्रद्धा तळले, गुंजन खडके, हर्शिता खडके, श्वेता सरोदे.

गरबा दांडिया आणि दशमा नियोजन समिती मध्ये प्रांजल खडके, शुभांगी पाटील, मोनाली जयस्वाल, मिताली खडके, सोनिया बऱ्हाटे, पायल खडके, स्नेहा खडके, उमा पारधी, योगिता खडके, भाग्यश्री चौधरी, रुपाली बोंडे, ज्योती मराठे.

शांतता व नियोजन समिती – भारती चौधरी, सुनीता सरोदे, मीनाक्षी पाटील, सुनंदा महाजन, रिटा खडके, शिल्पा खडके, दिपाली पाटील, आशा खडके, वर्षा झोपे, वर्षा पाटील, लक्ष्मी खडके, वर्षा खडसे सदस्यांचाही यात सहभाग असणार आहे असे श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील (बंटी) भारंबे यांनी मंजुरी दिली. यावेळी संस्थेचे सचिव मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्ष दिलीप महाजन, निलेश कोल्हे, विशाल खडके, रवींद्र खडके, योगेश खडके, स्वप्निल जयस्वाल बैठकीस उपस्थित होते.

तसेच यावर्षी केदारनाथ देवस्थानाची प्रतिकृती साकारण्यात येणार असून जळगाव शहरातील सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा

Tags: jalgaonjalgaon citymaharashtra
Previous Post

जळगाव विधानसभा लढण्यासाठी सज्ज ; अन्यथा वेगळा विचार ; भाजपाच्या इच्छुक उमेदवाराने तापवलं राजकारण

Next Post

विधानसभेसाठी मराठवाड्यात भाजपचं मायक्रो प्लॅनिंग ; 155 जागावर दावा

Next Post
विधानसभेसाठी मराठवाड्यात भाजपचं मायक्रो प्लॅनिंग ; 155 जागावर दावा

विधानसभेसाठी मराठवाड्यात भाजपचं मायक्रो प्लॅनिंग ; 155 जागावर दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!