राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जोमाने मैदानात उतरले असून त्यांच्या पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.. या पार्श्वभूमीवरच काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर आता तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आला आहे.. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली. जुन्नर मतदारसंघातून शेरकर इच्छुक आहेत. शेरकर सध्या काँग्रेसमध्ये आहेत मात्र जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. त्यामुळे लवकरच ते तुतारी हाती घेणार असल्याचे दिसून येत आहे.. दरम्यान या मतदारसंघात त्यांना अतुल बेनके यांचाआव्हान असणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या तरी जुन्नर विधानसभेच्या जागेचा तिढा वाढण्याची चिन्ह आहेत. जुन्नरच्या जागेवर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंचे समर्थक आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि आदिवासी, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी शरद पवारांची भेट घेऊन जुन्नरच्या जागेवर बेनकेंना उमेदवारी द्यावी अशी साद घातली आहे. बेनके आणि पवार कुटुंबाचा ऋणानुबंध जपला जावा अशीही विनंती त्यांनी केली आहे. मात्र आता या मतदारसंघात काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर रिंगणात उतरल्याने तगडी फाईट होणार आहे..
राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत सामील झालेल्या अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्क्यावर धक्के बसत आहेत.. गेल्या काही दिवसापूर्वीच अजित पवार गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार आहे.यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा दुहेरी धक्का बसणार आहे. दरम्यान विधानसभेच्या तोंडावर शरद पवार गटात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महायुतीला नक्की धडकी भरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..