• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे सरकारचा धडाका ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 19 हुन अधिक महत्वाचे निर्णय

Team Rajmudra by Team Rajmudra
October 14, 2024
in राजकीय
0
शिंदे सरकारचा धडाका ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 19 हुन अधिक महत्वाचे निर्णय
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकाने निर्णयांचा धडाका लावला आहे. विधानसभेआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली.. या बैठकीत मंत्रिमंडळाने महत्त्वाचे 19 मोठे निर्णय घेतले..यामध्ये मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे. आणखी एका महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय पुणे मेट्रो रेल टप्पा-२ संदर्भातही मोठा निर्णय घेतलाय.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय –

1. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)

2. आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)

3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)

4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)

5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)

6. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)

8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)

9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)

10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)

12. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)

13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)

14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)

15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)

16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)

17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट

18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)

19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)

20. दमण गंगा आणि गोदावरी नदी जोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मोठमोठे निर्णय घेत मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा चांगलाच प्रयत्न केला आहे..

Tags: #cm eknath shinde#eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakremaharashtra
Previous Post

काँग्रेसची दिल्लीत बैठक ; राहुल गांधी राज्यातील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार!

Next Post

जैन साधू-संतांच्या पदयात्रेत पोलीस संरक्षण मिळणार : विशेष पोलीस महानिरीकक्षकांचे आदेश

Next Post
जैन साधू-संतांच्या पदयात्रेत पोलीस संरक्षण मिळणार : विशेष पोलीस महानिरीकक्षकांचे आदेश

जैन साधू-संतांच्या पदयात्रेत पोलीस संरक्षण मिळणार : विशेष पोलीस महानिरीकक्षकांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!