• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन

Team Rajmudra by Team Rajmudra
October 20, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन
Spread the love

राजमुद्रा : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टस अॅकडेमी द्वारा ऑल इंडिया चेस फेडरेशन व एम.सी.ए. च्या मान्यतेने १९ व २० ऑक्टोबर असे दोन दिवसीय ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे आयोजन करण्यात आले. या सेमीनारचे उद्घाटन AICF अॅडव्हाइसरी कमीटी मेंबर व एम.सी.ए.चे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

या उद्घाटनप्रसंगी अशोक जैन म्हणाले की, अशा प्रकारच्या सेमीनारचे बुद्धिबळाच्या विकासासाठी, सक्षम व कुशल आरबीटर व कोचेस साठीचे महत्त्व विषद केले. चेस इन स्कूलचे महत्त्व विषद करून आरबीटर व कोचे यांनी सेमीनारचा फायदा घ्यावा व या क्षेत्रातील नवीन गोष्टींचे अपडेट करावे असा मोलाचा सल्ला दिला. तसेच या कार्यक्रमावेळी चिफ फॅकल्टी इंटरनॅशनल आरबीटर वसंत बी. एच. व आय.ए. नितीन शेणवी, पुणे यांचे स्वागत आय.ए. प्रवीण ठाकरे व आकाश धनगर यांनी केले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार विलास म्हात्रे यांनी अशोक जैन यांचे स्वागत केले. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटका, पश्चिम बंगाल इ. विविध राज्यांमधून एकुण ८० चेस आरबीटर व कोचेस यात सहभागी झालेले आहेत. जळगावमधून नथू सोमवंशी, भरत आमले व आकाश धनगर यांनी सहभाग नोंदवला. या सेमीनारसाठी जैन इरिगेशन प्रायोजकत्व लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचीव नंदलाल गादिया यांनी केले व सर्वांचे आभार मानले. भारतात तरुण व उद्योन्मुख खेळाडूंच्या आशादायी कामगोरी मुळे होणाऱ्या बुद्धीबळ या खेळाचा झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे अशा प्रकारच्या सेमीनारचा आवश्यकता आहे.बुद्धीबळ आरबीटरची क्षमता व कौशल्य वाढवणे, सुक्ष्म नियमांची माहीती देणे, तांत्रिक कौशल्य सुधारणे, टुर्नामेंटचे स्टॅंडर्डायझेशन (मानकीकरण) करणे, सहयोग वाढवणे, भविष्यातील नेते विकसीत करणे, बुद्धीबळ Ecosystem (परिसंस्था) वाढवणे, एकूण बुद्धीबळ पायाभूत सुविधा मजबूत करणे इत्यादी उद्दीष्ट या सेमीनारने साधले जातील सेमीनारच्या यशस्वीतेसाठी रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, संजय पाटील यांचे सहकार्य लाभले.

Tags: ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनारjalgaonmaharashtra
Previous Post

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार “; मंत्री अदिती तटकरे स्पष्टच बोलल्या!

Next Post

बुलढाण्यात ट्वीस्ट ; आता काका विरुद्ध पुतणी संघर्ष होणार?

Next Post
बुलढाण्यात ट्वीस्ट ; आता काका विरुद्ध पुतणी संघर्ष होणार?

बुलढाण्यात ट्वीस्ट ; आता काका विरुद्ध पुतणी संघर्ष होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!