• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तीचा तातडीने शोध घ्या – आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 27, 2021
in जळगाव
0
Spread the love

प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी करा –  आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील

जळगाव (राजमुद्रा) – कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची चाचणी करा. तसेच बाधित रुग्णांच्या संख्येनुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र ठरवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. अशा सुचना आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी आज दिल्यात. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने केलेल्या तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात डॉ अर्चना पाटील यांनी जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांचेशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला, यावेळी डॉ पाटील बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश दिघे आदि उपस्थित होते.

            डॉ पाटील पुढे म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींचा 48 तासाच्या आत शोध घेतला पाहिजे. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मायक्रो झोन तयार केले पाहिजे. जेणेकरुन त्या भागाचे सर्वेक्षण व्यवस्थित होऊन संशयित रुग्ण शोधण्यास मदत होते. प्रतिबंधात्मक क्षेत्रात सर्वेक्षण करतांना सारी व सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण सापडले पाहिजेत. कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी देण्यात येणारे थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर योग्य पध्दतीने काम करीत आहेत का याचीही तपासणी करावी. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या कामाचे समान वाटप करा. तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक यांनी समन्वय राखून आपल्या तालुक्यातील कामाचे नियोजन करावे. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियमितपणे प्रतिबंधात्मक क्षेत्र, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेटी द्याव्यात. त्याचबरोबर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये जम्बो सिलेंडरची तरतुद करावी.            

ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा

            सध्या राज्यात ऑक्सिजनचा साठा कमी असल्याने उपलब्ध ऑक्सिजनचा वापर योग्य पध्दतीने होण्यासाठी ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा. याकरीता प्रत्येक ठिकाणी दोन स्वतंत्र नर्सची नियुक्ती करावी. रुग्णाच्या आवश्यतेनुसारच त्याला ऑक्सिजन दिला गेला पाहिजे. तसेच दर चार तासांनी प्रत्येक रुगणांची ऑक्सिजन पातळी तपासावी. उपलब्ध ऑक्सिजन वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर रुग्णांची रक्त तपासणी दैनंदिन करावी. लसीकरण करतांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याच्या सूचना देतांनाच कोरोना सोबतच डिलीव्हरीचे पेशंट, अपघात व दैनंदिन तपासणीच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये असेही त्यांनी सांगितले. दैनंदिन कामाची माहिती कोविन व ईविन पोर्टलवर अपडेट करण्याच्या सुचनाही डॉ पाटील यांनी सर्व यंत्रणांना दिल्यात.

Tags: corona testingjalgaonjilhadhikari abhijit rautmaharashtravivid
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 9 लाख संशयितांची करण्यात आली कोरोना चाचणी

Next Post

महापौरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

Next Post

महापौरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!