• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ शहरात पत्रकारास मारहाण ः चौघांविरोधात गुन्हा

Team Rajmudra by Team Rajmudra
October 22, 2024
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळ शहरात पत्रकारास मारहाण ः चौघांविरोधात गुन्हा
Spread the love

राजमुद्रा : विवाहितेला शिवीगाळ केल्याचा पतीने जाब विचारल्यानंतर पत्रकारासह त्याच्या चालकाला गुंड प्रवृत्तीच्या चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री आठ वाजता शहरातील महेश नगरात घडली.. याप्रकरणी चौगाव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील महेश नगर भागातील रहिवासी पत्रकार विकास चव्हाण यांच्या पत्नी व संशयीत गिरीश पाटील यांची पत्नी परिसरातील भंडार्‍यात सोबत जेवणाला गेल्यानंतर संशयीत गिरीशने जुना वाद उकरून काढत ‘तु हिच्या सोबत जेवणला का गेली ? असा जाब आपल्या पत्नीला विचारला. त्यावेळी तक्रारदार महिलेने दादा तुम्ही अस का बोलताय ? असे विचारले असता गिरीशने जुना वाद उकरून काढत विवाहितेला शिविगाळ केली तसेच पीडितेच्या हातातील मोबाईल हिसकावला. पीडीतेने पत्रकार असलेल्या पती विकास चव्हाण यांना हा प्रकार कळवताच ते घरी आले व त्यांनी संशयीत गिरीशला जाब विचारला असता त्याने पत्राकार विकास चव्हाण यांनाही शिविगाळ केली. चव्हाण हे पत्नीसह पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले मात्र पुन्हा वाद वाढायला नको म्हणून त्यांनी तक्रार न देता घर गाठले.
चौघा संशयीतांकडून बेदम मारहाण करण्यात आली.त्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेल्याचा राग मनात धरत गिरीश पाटील याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी बोलावून घेत पत्रकार विकास चव्हाण, त्यांचे शालक विजय मिस्तरी व त्यांच्या सोबतचा हेमंत लोहार यास शिविगाळ करीत मारहाण केली. गिरीश पाटीलसह युवराज राठोड, राहुल गोसावी, डिगा सरोदे यांनी विजय मिस्तरी याच्या डोक्यात वीट मारत गंभीर जखमी केले. तसेच पत्रकार विकास चव्हाण, हेमंत लोहार यांनाही मारहाण केली.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयीत गिरीश पाटील, युवराज राठोड, राहुल गोसावी, डिगा सरोदे यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत पसार झाले असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

Previous Post

भाजपा नेत्या पंकजा मुंडे अजितदादांच्या भेटीला ; देवगिरीवरील भेटीच गुपित काय?

Next Post

शरद पवार गटाची “ती” याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Next Post
शरद पवार गटाची “ती” याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

शरद पवार गटाची "ती" याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!