• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ; गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथील बाप्पाला साकडे

Team Rajmudra by Team Rajmudra
October 27, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ; गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथील बाप्पाला साकडे
Spread the love

राजमुद्रा : जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे ग्रामीण आमदार आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शिवसेनेकडून संधी देण्यात आली आहे.. यानंतर आता जळगाव ग्रामीण मतदारसंघांमध्ये प्रचारांचा धडाका सुरू झाला आहे.. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्री गुलाबराव पाटील यांनी पद्मालय मंदिरात श्री गणेशाच्या चरणी विजयाचं साकडं घातलं. पद्मालय मंदिराच्या पवित्र परिसरात, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य मांदियाळी जमा झाली होती. माझ्या विजयासह राज्यात महायुतीचे सरकार येवू दे असे साकडे गणरायाला घातले असून जनतेच्या आशीर्वादाने आणि बापाच्या कृपेने प्रचंड मताधिक्याने माझा विजय होणार असल्याचा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला..

शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील हे सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढवत असून श्री गणरायाच्या अडीच पीठापैकी एक असलेल्या बाप्पाचे गुलाबराव पाटील यांनी दर्शन घेत आरती करून आज प्रचाराचा श्रीगणेशा केला..दरम्यान महायुतीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र मध्ये विकासाची गंगा वाहली असून मतदार संघात केलेला विकासाच्या मुद्द्यावरच आपण ही निवडणूक लढत आहोत. महायुतीला राज्यात पावणे दोनशेच्या वर जागा मिळतील, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागास वर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे, महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी – कोल्हे, अनिल अडकमोल , पवन सोनवणे, महायुतीचे तालुका पदाधिकारी यांच्यासह अनेक जेष्ठ मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी उत्साहात गुलाबराव पाटील यांचे जोरदार स्वागत केले, यावेळी गणपती बाप्पा मोरया, गुलाबराव पाटील आगे बढो, बाळासाहेबांचा विजय असो, महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी पद्मालय परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, पी. एम. पाटील, रवी कापडणे, तालुकाप्रमुख डी.ओ. पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर , भाजपाचे तालुका अध्यक्ष हर्षल चौधरी, हर्षल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद मानकरी, भाजपचे महिला तालुकाध्यक्ष रेखाताई पाटील, सेनेच्या तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील, भारतीताई चौधरी , जळगावचे मा. नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, अजय पाटील, दिलीप पोकळे, कैलास चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष राजू सोनवणे, राजेंद्र पाटील, हर्षल पाटील, यांच्यासह जळगाव व धरणगाव तालुक्यातील पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakremaharashtraमंत्री गुलाबराव पाटील
Previous Post

आमदार मंगेश चव्हाण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार ; ऐतिहासिक रॅलीसह शक्तिप्रदर्शन!

Next Post

म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटलांना प्रचंड प्रतिसाद !

Next Post
म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटलांना प्रचंड प्रतिसाद !

म्हसावद - बोरणार जिल्हा परिषद गटात गुलाबराव पाटलांना प्रचंड प्रतिसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!