• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जयश्री महाजन या उमेदवारी अर्ज दाखल करणार

Team Rajmudra by Team Rajmudra
October 28, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जयश्री महाजन या उमेदवारी अर्ज दाखल करणार
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर ठेवून ठेवल्या असताना सर्वच राजकीय पक्षांकडून अंतिम याद्या जाहीर करण्यात येत आहे तर उमेदवारी मिळाल्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल करण्यात येत आहेत.. या पार्श्वभूमीवरच जळगाव शहर विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेल्या जयश्री महाजन या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत..मंगळवारी दुपारी १२ वाजता शिवतीर्थावरुन तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे..

या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाकडे पहिले पाऊल मी मंगळवारी टाकणार आहे. मंगळवारी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असे प्रतिपादन जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी सांगीतले.

गेल्या दहा वर्षातील भरकटलेला विकास मार्गावर आणण्यासाठी, निर्माण झालेला विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचेही प्रतिपादन जयश्री महाजन यांनी यावेळी केले. याप्रसंगी आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज मलिक, काँग्रेसचे शहराध्यक्ष शाम तायडे, आपचे शहर संयोजक डॉ. सुनिल गाजरे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दरम्यान दोन दिवसापूर्वीच जयश्री महाजन यांची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर करण्यात आली होती. त्याचे स्वागत शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते.

Tags: jalgaonmaharashtrasuddhav thakre
Previous Post

मविआच टेन्शन वाढणार ; चोपडा विधानसभेत राष्ट्रवादी वेगळी चूल मांडणार?

Next Post

भाजपाला धक्का : प्रभाकर गोटू यांना ठाकरे गटाची उमेदवारी

Next Post

भाजपाला धक्का : प्रभाकर गोटू यांना ठाकरे गटाची उमेदवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!