• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन करत आमदार मंगेश चव्हाण यांनी फुंकला विजयाचा शंखनाद

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

Team Rajmudra by Team Rajmudra
October 28, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन करत आमदार मंगेश चव्हाण यांनी फुंकला विजयाचा शंखनाद
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षांकडून अंतिम यादी जाहीर करण्यात येत आहे तर दुसरीकडे तिकीट मिळालेले उमेदवार जोरदार शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.. या पार्श्वभूमीवरच आता चाळीसगाव येथील आजवरच्या सर्व गर्दिचे उच्चांक मोडीत काढत भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांनी आज हजारो जनसमुदायाच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील, पाचोरा येथील आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडेसर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, शिवसेनेचे उमेश (पप्पूदादा) गुंजाळ, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवनराजे सोनवणे, भाजपा जनजाती मोर्चाचे प्रदेश संयोजक किशोर काळकर, धनगर समाजाचे नेते नवनाथ ढगे, जिल्हा सरचिटणीस मधुबाऊ काटे यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील व चाळीसगाव तालुक्यातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर सकाळी नऊ वाजल्यापासून शहर व तालुक्यातील कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती आणि बघता बघता तीस हजारांहून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून ही नामांकन रॅली ऐतिहासिक बनवली. तालुकाभरातील शेकडो वारकरी आपल्या पोशाखात टाळ मृदंगासह उपस्थित होते तर लाडक्या बहिणी यांचीदेखील उपस्थीती हजारोंच्या संख्येत बघायला मिळाली. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होऊन सावरकर चौक, गणेश रोड, शिवाजी महाराज चौक मार्गे रेल्वे पुलावरून प्रशासकीय इमारत या ठिकाणी पोहोचल्यावर रॅलीचे विराट सभेत रुपांतर झाले होते. तत्पूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय रामराव जीभाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, शिवाजी घाटावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, संताजी जगनाडे महाराज यांचे स्मारक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे जाऊन अभिवादन केले.

आमदार मंगेशदादा चव्हाण, प्रतिभाताई चव्हाण यांच्यासह संपूर्ण कुटुंब रॅलीत सहभागी झालेले यावेळी पहायला मिळाले. आकर्षक फुलांनी सजवलेल्या ट्रकवरुन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सर्व जनतेला अभिवादन केले. विराट जनसमुदाय उपस्थित असल्याने संपूर्ण शहरात भाजपमय वातावरण दिसत होते. चाळीसगाव शहरातील नागरिकांकडून या रॅलीचे ठिकठिकाणी उस्फुर्त स्वागत करण्यात आले तर ठिकठिकाणी सर्वसामान्य चाळीसगावकर व व्यापारी वर्गाकडून रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ठिकठिकाणी उपस्थित जनतेकडून रॅलीतील सहभागी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी तसेच नाश्त्याची सोय करुन देण्यात आली होती.

मतदारसंघाच्या विकासासाठी धडपडणारा मंगेश चव्हाण यांच्यासारखा होणे सोपे नाही :- मंत्री गिरीश महाजन

आमदार मंगेश चव्हाण यांची पक्षाने केलेली निवड अतिशय सार्थ ठरली असून पहिल्याच टर्म मध्ये त्यांनी केलेले विकास कामे निश्चितच प्रत्येक आमदाराला हेवा वाटावा असेच आहेत, विकासासाठी धडपड व विकास कामांसाठी मंत्रालयात टेबल टू टेबल फिरणारा आमदार मंगेश चव्हाण होणे सोपे नसल्याची भावना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या नामांकन रॅलीचे शेवटी सभेत रूपांतर झाले यावेळी सभेत संबोधन करताना मंत्री महाजन बोलत होते. ज्यांना संधी दिली त्यांनी शहराला मागे नेण्याचे काम गेल्या दहा वर्षांमध्ये केले, मात्र मंगेश दादा चव्हाण यांनी हा सर्व बॅकलॉग भरून काढला असल्याचेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. यावेळी खासदार स्मिताताई वाघ व आमदार चिमणआबा पाटील यांनीही मंगेश दादा यांचे तोंड भरून कौतुक केले व प्रचंड मतांनी विजयी होणार असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आणि निवडणूक घेतली जनतेनेच आपल्या हातात

आमदार चव्हाण यांच्या नामांकन रॅलीच्या सुरुवातीला तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि कमळ हाती घेतले. यावेळी उपस्थित नेत्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. एकंदरीत हि निवडणूक …

Tags: maharashtraआमदार मंगेश चव्हाण
Previous Post

रावेर विधानसभेसाठी अमोल जावळेचां अर्ज दाखल ; गिरीश महाजनांसह रक्षा खडसेंची प्रमुख उपस्थिती!

Next Post

गुलाबराव पाटलांच्या प्रचार रॅलीचा थरार: धनुष्यबाण आणि भगवे झेंडे सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक

Next Post
गुलाबराव पाटलांच्या प्रचार रॅलीचा थरार: धनुष्यबाण आणि भगवे झेंडे सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक

गुलाबराव पाटलांच्या प्रचार रॅलीचा थरार: धनुष्यबाण आणि भगवे झेंडे सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!