• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने विजयश्री मिळण्याचा विश्वास; जयश्रीताई महाजनांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Team Rajmudra by Team Rajmudra
November 8, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
ग्रामदैवत प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने विजयश्री मिळण्याचा विश्वास; जयश्रीताई महाजनांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Spread the love

राजमुद्रा : जळगाव शहराचे ग्रामदैवत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन आज प्रभाग क्रमांक १७ मधील प्रचार दौरा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी सकाळच्या सत्रात पूर्ण केला. आजच्या प्रचार रॅलीची सुरुवात जुन्या जळगावातील तरुण कुढापा चौकातून करण्यात आली. मोठ्या उत्साहात निघालेल्या या रॅलीत महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग होता.

तेली चौक मार्गे प्रचार रॅली जळगावचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम मंदिरापर्यंत पोहचली. महाविकास आघाडीच्या विधानसभा उमेदवार जयश्री महाजन आणि त्यांचे पती सुनील महाजन यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. निवडणुकीतील आपल्या विजयासाठी प्रभू श्रीरामाला साकडे घातले. यावेळी बोलतांना, जयश्री महाजन यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असून, ग्रामदैवताच्या आशीर्वादाने विजयश्री खेचून आणू. कारण माझी उमेदवारी ही जळगावकरांसाठीच असून, माझा विजय म्हणजे त्यांचाच विजय आहे, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

त्यानंतर प्रचार रॅली आंबेडकर नगरमध्ये आल्यावर जयश्री महाजन यांनी बुद्ध विहारात जाऊन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्यावर लवकरच निराकरण होण्याबद्दल आश्वस्थ केले.

यानंतर प्रचार रॅली खानदेशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ऐतिहासिक वाड्याजवळ पोहोचली. जयश्री महाजन आणि महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खान्देशकन्या बहिणाबाई यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या मातीला साहित्यिकदृष्ट्या समृध्द केल्याबद्दल त्यांचे कृतज्ञ स्मरण केले. आजच्या प्रचार रॅलीत महाविकास आघाडीचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: maharashtrasharad pawaruddhav thakreजयश्री महाजन
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारासाठी अमित शहाचीं “या “ठिकाणी सभा

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खानदेशात सभांचा धडाका : सभेतून जाहीर केला निर्णय?

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खानदेशात सभांचा धडाका :  सभेतून जाहीर केला निर्णय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खानदेशात सभांचा धडाका : सभेतून जाहीर केला निर्णय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!