• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जयश्रीताईंच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणांना शहरात रोजगारनिर्मितीचे दिले आश्वासन

Team Rajmudra by Team Rajmudra
November 9, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
जयश्रीताईंच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणांना शहरात रोजगारनिर्मितीचे दिले आश्वासन
Spread the love

राजमुद्रा : जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराला आता वेग धरला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद देत असून, प्रचाराच्या फेऱ्यांना होणारी गर्दी पाहता जयश्री महाजन यांच्या प्रचाराने आता शहरातील नागरिकांवर प्रभाव पाडायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

जयश्री महाजन यांनी शहरातील कलिंकामाता मंदिरात देवीचे दर्शन घेतले. शहर विकासाच्या आपल्या प्रयत्नाना यश देण्याचे देवीला साकडे घालून, त्यांनी प्रभाग क्रमांक १७ मधील आपल्या प्रचार अभियानाला सुरुवात केली. यावेळी उपस्थित महिलांसह वयोवृद्धांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे प्रचार फेरीची सुरुवातच जोशपूर्ण वातावरणात झाली.

प्रभाग क्रमांक १७ मधील हॅप्पी होम कॉलनी, रामचंद्र नगर, दत्त मंदीर परिसर, अजिंठा हौसिंग सोसायटी, श्रीराम मंदीर परिसर, बालाजी मंदीर, गौरव हॉटेलमागील परिसर, सिध्दीविनायक शाळेजवळील परिसर, हनुमान नगर, म्हाडा कॉलनी या मार्गे रेमंड कॉलनीत प्रचार फेरीचा समारोप झाला. या दरम्यान जयश्री महाजन यांनी हॅप्पी होम कॉलनीत नागरिकांना भेटून संवाद साधला. या ठिकाणी लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांनी जयश्री महाजन यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अयोध्यानगरातगी नागरिकांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी समर्थनार्थ घोषणा देत लोकांनी जयश्री महाजन यांना पाठींबा दिला.

या प्रचार सभेदरम्यान जयश्री महाजन यांनी परिसरातील तरुणांशी संवाद साधताना, रोजगाराच्या मुद्द्याला विशेष प्राधान्य दिले. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, आपल्या शहरातील अनेक युवकांना दुसऱ्या शहरात जाऊन नोकरीसाठी धडपड करावी लागते आणि त्यामुळे कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते, ही परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे. मी निवडून आल्यास तरुणांच्या रोजगारासाठी प्रभावी उपाययोजना करेन व जळगावातील तरुणांना शहरातच रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.

जयश्री महाजन यांच्या या प्रचार मोहिमेत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. जयश्री महाजन यांच्या प्रचारामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे संचार झाले असून, त्यांनी एकजुटीने प्रचारात झोकून दिल्याने, ठिकठिकाणी होणाऱ्या प्रचार रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

जयश्री महाजन यांनी जाहीर केलेल्या आश्वासनांमुळे जळगाव शहरातील नागरिकांसाठी एक आशावादी वातावरण निर्माण होत असून, हीच आशा आता ऊर्जा बनून येत्या निवडणुकीत जयश्री महाजन यांना एक सक्षम नेतृत्व म्हणून पुढे आणेल, अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा आहे.

Tags: jalgaonmaharashtraजयश्री महाजन
Previous Post

फुलांच्या वर्षावात मेहरुण परिसरात आ. राजूमामा भोळे यांचे नागरिकांकडून स्वागत

Next Post

शिवनेरी फाउंडेशन व भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती

Next Post
शिवनेरी फाउंडेशन व भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती

शिवनेरी फाउंडेशन व भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!