• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हेच माझे प्राधान्य – जयश्रीताई महाजन

Team Rajmudra by Team Rajmudra
November 9, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हेच माझे प्राधान्य – जयश्रीताई महाजन
Spread the love

राजमुद्रा : जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला प्रथम प्राधान्य देऊन शहरातील समस्यांचे निवारण करण्याचे वचन महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी दिले आहे. आज सकाळच्या सत्रात जयश्री महाजन यांनी आपला प्रचार प्रभाग क्रमांक १२ मध्ये प्रभात चौकातील दक्षिण मुखी हनुमानाचे दर्शन घेऊन व आपल्या शहराच्या सर्वांगिण विकासाला, तरुणांना इथेच रोजगार मिळवून द्यायला तसेच जळगावकर नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या कार्याला बळ देण्याचे आवाहन केले.

यावेळी शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील एम.जे.कॉलेज परिसर, विठ्ठल रुख्मिणी मंदीर, लाठिज परिसर, दक्षिणमुखी हनुमान मंदीर, हिरकणी ब्यूटी पार्लर, रामदास कॉलनी, ओंकारेश्वर मंदिर परिसर, सेंट जोसेफ हायस्कूल परिसर, साईबाबा मंदीर, गुलमोहर कॉलनी, लक्ष्मीनगर, पोस्टल कॉलनी, महादेव मंदीर, वल्लभनगर, धांडेनगर, फोर स्टार रेसिडेन्सी, धांडे नगर, गोदावरी चक्की, दत्तमंदीर, विवेकानंद नगर या मार्गे जावून अनुराधा रेसिडेन्सी येथे प्रचार रॅलीचा समारोप झाला. या प्रचार रॅली दरम्यान त्यांचे परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करत, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रचार फेरीदरम्यान ठिकठिकाणी जयश्री महाजन यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलतांना त्यांनी जळगावकरांना उद्देशून सांगितले की, “आपल्या शहराचे नाव सोन्याच्या शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातून शुध्द सोने घ्यायला आपल्याकडे लोक येतात. मात्र सध्या शहराचा विकास अनेक समस्यांच्या काजळीने झाकोळला आहे. ही काजळी दूर करण्यासाठी आणि शहराला पुन्हा सोन्यासारखीच चकाकी देण्यासाठी तुमचा आशीर्वाद मतांच्या रूपाने पदरी पडावा. तुमच्या साथीने जळगावला निश्चितच आम्ही सर्वांगीण विकासाच्या वाटेवर पुढे नेईल.”
असे आव्हान त्यांनी केले.

या प्रचार फेरीत शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद आबा तायडे, उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगर प्रमुख जया तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, प्रकाश पाटील, सलीम खाटीक, पिंटू तायडे, किरण भावसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, रहीम तडवी, पूनम राजपूत, प्रमोदभाऊ झंवर, ओगल पांचाळ, संजू महाजन, इंद्रसेन पारेख, देविदास पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये झालेल्या या रॅलीने जयश्री महाजन यांच्या प्रचाराला जोरदार चालना मिळाली असून जळगाव शहराच्या विकासासाठी जयश्री महाजन यांनी ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंगमधून जाहीर केलेले मुद्दे आणि मांडलेले जळगावकरांचे प्रश्नांकडे नागरिक आकर्षित होत असून, या होर्डिंगची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

Tags: jalgaonmaharashtraजयश्री महाजन
Previous Post

पोर्शकारवरून राजकारण तापलं :आमदार सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस

Next Post

निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील अन अजित पवार गटाच्या माजी खासदारामध्ये बंद दाराआड चर्चा.

Next Post
निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील अन अजित पवार गटाच्या माजी खासदारामध्ये बंद दाराआड चर्चा.

निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील अन अजित पवार गटाच्या माजी खासदारामध्ये बंद दाराआड चर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!