• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रांगोळ्या, फुलांच्या पायघड्यांनी आमदार भोळेंचे कोल्हे नगरात स्वागत

विश्वास जुना राजू मामा पुन्हा रांगोळीने वेधले रॅलीचे लक्ष

Team Rajmudra by Team Rajmudra
November 11, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
रांगोळ्या, फुलांच्या पायघड्यांनी आमदार भोळेंचे कोल्हे नगरात स्वागत
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे.. या पार्श्वभूमीवरच आता प्रचारात आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांचे भगवान नगर भागात पूर्ण गल्लीमध्ये सडा-समार्जन करून रांगोळ्या व फुलांच्या पाकळ्यांनी मार्ग सुशोभीत स्वागत करण्यात आले. तरुणांसह अबाल वृध्दांकडून मिळालेल्या प्रेमाने आमदार भोळे भारावून गेले.

भूषण कॉलनी येथील काशी विश्वेश्वर मंदिर येथे पूजा करून सोमवारी सकाळी पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. तिथून कोल्हे नगर, मुंदडा नगर, अंबिका हौसिंग सोसायटी भगवान नगर, शास्त्रीनगर, रामानंदनगर, विवेकानंद नगर मार्गे वाघ नगर परिसरात प्रचार रॅलीचा समारोप झाला. मार्गात महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर आशाताई कोल्हे, माजी नगराध्यक्ष सिंधुताई कोल्हे, वसंतराव कोल्हे यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठांचे आमदार भोळे यांनी आशीर्वाद घेतले.

माजी महापौर ललित कोल्हे यांच्या घरी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी यांनी काढलेली “विश्वास जुना, राजूमामा पुन्हा” या शीर्षकाखालील रांगोळी रॅली दरम्यानची आकर्षण ठरली. रॅलीच्या शेवटी वाघ नगर परिसरात माजी नगरसेविका उषाताई संतोष पाटील यांच्या घरी भाजप,शिवसेना व महायुती पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये भाजप महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक गायत्री राणे, उषाताई पाटील, मंडळ क्रमांक ६ चे अध्यक्ष बापू कुमावत, अजित राणे, राजेंद्र खैरनार, संतोष पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: bjpjalgaonmaharashtraमहायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे
Previous Post

लहान विक्रेत्यांची पसंती फक्त जयश्रीताई… जयश्री महाजन यांची प्रचार रॅलीत विक्रेत्यांचा एकच नारा…

Next Post

भाजप राहुल गांधीविरोधात ॲक्शन मोडवर : निवडणूक आयोगाकडे केली तक्रार!

Next Post
भाजप राहुल गांधीविरोधात ॲक्शन मोडवर : निवडणूक आयोगाकडे केली तक्रार!

भाजप राहुल गांधीविरोधात ॲक्शन मोडवर : निवडणूक आयोगाकडे केली तक्रार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!