• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाहत्यांचे निस्सीम प्रेम, आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!

निवृत्ती, मुक्ताई, बी.जे. नगरात ओसंडून प्रेमवर्षाव, उत्स्फूर्त स्वागतासाठी लागली रीघ

Team Rajmudra by Team Rajmudra
November 15, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
चाहत्यांचे निस्सीम प्रेम, आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!
Spread the love

राजमुद्रा : जळगाव येथील शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यावर प्रचारात दिवसेंदिवस चाहत्यांचे प्रेम ओसंडून वाहताना दिसून येत आहे. गुरुवारी संध्याकाळी वरद प्रतिष्ठानने बजरंग बोगदा परिसरात थेट जेसीबीने भव्य पुष्पहार घालून इतर जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. चाहत्यांच्या या निस्सीम प्रेमाने आ. राजूमामा भोळे काही काळ हरखून गेले होते.

आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी दुसऱ्या टप्प्यात मानराज पार्क परिसरातील कार्यकर्ते राहुल पाटील यांचे घरापासून रॅलीला सुरुवात केली. तेथून निवृत्ती नगर, मुक्ताईनगर, एसएमआयटी कॉलेज परिसर, भिकमचंद जैन नगर, भोईटे नगर मार्गे माजी नगरसेविका लताताई भोईटे यांच्या घरी समारोप करण्यात आला. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी महिला भगिनींकडून आ. राजूमामा भोळे यांचे औंक्षण करण्यात आले. तर मार्गातील श्री स्वामी समर्थ केंद्र, कार्तिक स्वामी मंदिर अशा विविध मंदिरात उपस्थिती देऊन दर्शन घेतले.

रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक विजय पाटील, डॉ. चंद्रशेखरपाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज चौधरी, महिला मोर्चा सरचिटणीस सविता बोरसे, भाजप मंडळ क्रमांक ५ चे अध्यक्ष शक्ती महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे राहुल पाटील, जिभाऊ वानखेडे, योगेश गोसावी, संकेत शिंदे, जय सोनवणे, मंगलसिंग पाटील, निताताई पाटील, वैशाली पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, पियुष कोल्हे, उमेश सोनवणे, पप्पू भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साजिद पठाण, विकी राजपूत, माजी नगरसेवक लता मोरे, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, अक्षय मेघे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: jalgaonmaharashtraआ. राजूमामा भोळे
Previous Post

वाढदिवस साधेपणाने साजरा करणार, निवडणूक कार्यालयातच शुभेच्छा स्वीकारणार : अमोल शिंदे

Next Post

खडसेंची तोफ धडाडणार : जयश्री महाजनांच्या प्रचारार्थ सुभाष चौकात आज जाहीर सभा

Next Post
खडसेंची तोफ धडाडणार : जयश्री महाजनांच्या प्रचारार्थ सुभाष चौकात आज जाहीर सभा

खडसेंची तोफ धडाडणार : जयश्री महाजनांच्या प्रचारार्थ सुभाष चौकात आज जाहीर सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!