• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव अपक्ष उमेदवार सुनील मोरेंचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा .

Team Rajmudra by Team Rajmudra
November 16, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
चाळीसगाव अपक्ष उमेदवार सुनील मोरेंचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा .
Spread the love

राजमुद्रा : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुनील ताराचंद मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी, महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. चाळीसगाव विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत श्री मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अनुक्रमांक ८ असून निशाणी शिट्टी होती. आता त्यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेत असल्याने तसे पत्रनिवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहे, त्याचप्रमाणे जाहीर पाठिंबाचे पत्र आमदार मंगेश दादा चव्हाण यांना दिले

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांचा एकूणच विकास कामांचा झंझावात पाहता तसेच कुठलाही भेदभाव न करता सर्वसमावेशक विविध सामाजिक व जाती धर्मासाठी त्यांनी केलेली विकास काम पाहता तेच विधानसभेसाठी योग्य उमेदवार आहेत अशी माझी खात्री झाली असल्याने मी या निवडणुकीतून विनाशर्त व कुठल्याही दबावाखाली न येता माघार घेत आहे. असे नमूद केले आहे. तसेच त्यांनी जी आश्वासने प्रचाराच्या निमित्ताने आदिवासी समाजाला दिली होती ती पुढील काळात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा शब्द समाज बांधवांना दिला आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी तालुक्यात आजपर्यंत कोणी केले नाही असे विकास कामे आदिवासी समाजासाठी केले असल्याने व भविष्यात देखील ते अधिक विकास कामे करू शकतील याचा विश्वास मला असल्याने सर्व समाज बांधवांनी अनुक्रमांक २ समोरील कमळ चिन्हापुढील बटण दाबून मंगेश रमेश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्यावे असे जाहीर आवाहन त्यांनी आहे.

श्री मोरे हे आदिवासी समाजाचे युवा कार्यकर्ते असून त्यांच्यामुळे मंगेश दादा चव्हाण यांना निश्चितच लाभ मिळणार आहे. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मदतीला मिळणार आहे.आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील आदिवासी समाजासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.

Tags: #मंगेश चव्हाणjalgaonmaharashtra
Previous Post

जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

Next Post

धक्कादायक : चोपड्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यालयावर धाड

Next Post

धक्कादायक : चोपड्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यालयावर धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!