• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रचाराचा धुरळा उडणार : अमित शाह, प्रियांका गांधींसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा

Team Rajmudra by Team Rajmudra
November 17, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
प्रचाराचा धुरळा उडणार : अमित शाह, प्रियांका गांधींसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. निवडणूक प्रचारासाठी जेमतेम काही दिवस शिल्लक असल्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने आक्रमक प्रचारावर भर दिला आहे. परिणामी राज्यात आरोप – प्रत्यारोपांना धार चढली असून या धुमश्चक्रीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवरच भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची गडचिरोलीत सभा होणार आहे. मुंबईतील वांद्रे भागातील बीकेसी मैदानावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचीही गडचिरोलीत सभा होणार आहे. याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत . त्यामुळे या सभांमधून नेते मतदारांना काय साद घालणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात आज महायुतीचे विरुद्ध महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांची आज सभा होणार आहे..केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची आज प्रचार सभा होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आरमोरी अहेरी या तीन मतदार संघाच्या प्रचारासाठी आज गडचिरोली अमित शाह दाखल होणार आहेत. अकरा वाजता मतदारांना संबोधित करणार आहेत. मागच्या 2019 च्या निवडणुकीनंतर या निवडणुकीत अमित शाह पहिल्यांदाच गडचिरोलीत येणार आहेत. शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणावर प्रचार सभा होणार आहे. तर याच मतदारसंघात दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी देसाईगंज येथे प्रचार सभा होणार आहे. प्रियांका गांधी यांची गडचिरोली जिल्ह्यात या निवडणुकीत पहिलीच सभा देसाईगंज इथं होणार आहे. त्यामुळे या सभेतून त्या कोणावर रोख ठेवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही आज सभा होणार आहेत. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रचारसभेला शिंदे उपस्थित असणार आहेत. साक्री, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ, नांदगाव, भांडुप, भायखळा या ठिकाणी शिंदेंच्या सभा होणार आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात सभा होणार आहे. चांदवड, नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती विधानसभेचे उमेदवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज गाव भेट दौरा करणार आहेत. निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय नेते प्रचारातून काय मतदारांना साद घालणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..

Tags: #cm eknath shindemaharashtra
Previous Post

विधानसभेच्या धामधुमीत चोपड्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यालयावर धाड

Next Post

आघाडीत बिघाडी : पुण्यातील माजी आमदाराचा अपक्षाला पाठिंबा

Next Post
मविआत काँग्रेसच्या पत्रामुळे नाराजी नाट्य ; उद्धव ठाकरेंचा माघार न घेण्याचा निर्णय?

आघाडीत बिघाडी : पुण्यातील माजी आमदाराचा अपक्षाला पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!