• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर

महापालिकेत घेणार आढावा बैठक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 9, 2021
in जळगाव, राजकीय
0
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यावर प्रथमच नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ना. शिंदे हे शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना सज्ज झाली आहे.

पाचोरा भडगाव तालुक्यातील विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर जळगाव येथे माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या घरी सांत्वन भेट देणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी दिली.

त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

१० जुलै सकाळी ११:००  वाजता मुंबई विमानतळ येथून खासगी विमानाने जळगावकडे प्रयाण. दुपारी १२:०० वाजता जळगावला आगमन. १२:१५ माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट. दुपारी १२:३०  वाजता मनपा येथे भेट व आढावा. दुपारी ०१:०० वाजता जळगाव येथे शिरसोली, वावडदा, जामनेर, नांदुरा मार्गे पाचोरा शहरात आमदार किशोर पाटील यांच्या घरी आगमन व राखीव. दुपारी ०१:४५ पाचोरा येथून भडगाव शहराकडे प्रयाण. दुपारी ०२:०० वाजता भडगाव नगरपरिषदेने नवीन बांधलेल्या कै. शेठ चोरडिया अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा. दुपारी ०२:१५ वाजता नगरपरिषदेने नवीन बांधलेल्या घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प लोकार्पण सोहळा. दुपारी ०३:०० वाजता भडगाव शहरातील रोड येथील साईबाबा मंदिरात सदिच्छा भेट. दुपारी ०३:१० वाजता भडगाव येथून पाचोरा शहराकडे प्रयाण. दुपारी ०३:२० वाजता पाचोरा शहरातील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा. दुपारी ०३:३० वाजता पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथील हिवरा नदीवरील पुलाचा भूमिपूजन सोहळा. ०३:४० पाचोरा शहरातील पांचाळेश्वर मंदिराजवळील हिवरा नदीवरील पुलाचा भूमिपूजन सोहळा. दुपारी ०३:५० वाजता पाचोरा शहरातील स्मशानभूमी जवळील नदीवरील पुलाचा भूमिपूजन सोहळा. दुपारी ०४:००  वाजता पाचोरा शहरातील माजी मंत्री स्व. के एम बापू पाटील व्यापारी संकुल भाजी मंडी लोकार्पण सोहळा ०४:४५ वाजता पाचोरा येथून जळगावकडे प्रयाण सायंकाळी ०५:३० वाजता खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Tags: eknath shindejalgaonjalgaon daurapachorashivsena
Previous Post

नवीन केंद्रीय सहकार खात्याचा महाराष्ट्राला होणार फायदा

Next Post

आता मंदाताई खडसे ही अडकणार चौकशीच्या फेऱ्यात

Next Post
आता मंदाताई खडसे ही अडकणार चौकशीच्या फेऱ्यात

आता मंदाताई खडसे ही अडकणार चौकशीच्या फेऱ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!