• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित!

Team Rajmudra by Team Rajmudra
December 8, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित!
Spread the love

राजमुद्रा : विधानसभेचे विशेष अधिवेशन कालपासून मुंबईत पार पडत आहे. या दोन दिवसांमध्ये 288 आमदारांना विधानसभेच्या सदस्यत्वाची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येत आहे. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यानंतर उद्या 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. या अध्यक्षपदासाठी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला.. मात्र कोणीही अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांचंच नाव निश्चित मानलं जाते.

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन कालपासून सुरू झाल आहे.. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून भाजपने विधानसभा अध्यक्षपदावर दावा करत त्याची जबाबदारी राहुल नार्वेकरांकडे दिली आहे.यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाणार आहे. यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद केली जाणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या महाविकास आघाडीने एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही..विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही आज दुपारी 12 वाजेपर्यंत होती. या मुदतीत महाविकासाआघाडीने एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यातच यंदा महायुतीकडे प्रचंड संख्याबळ आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड होईल हे निश्चित झाले आहे.

राहुल नार्वेकर हे वकील असून त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. राहुल नार्वेकरांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.यानंतर आता झालेल्या २०२४ च्या निवडणुकीत देखील ते याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ते विजयी झाले. राहुल नार्वेकर हे २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. आता पुन्हा एकदा त्यांच्या नावाची वर्णी लागणार असल्याच निश्चित झाला आहे.

Tags: maharashtraविधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकरच!
Previous Post

शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात अकरा आमदारांची वर्णी ; “या “2 आमदारांना डच्चू!

Next Post

विधानभवनात ‘जय अहिराणी, जय खानदेश’चा नारा : भाजप आमदारांने घेतली अहिराणीतून शपथ!

Next Post
विधानभवनात ‘जय अहिराणी, जय खानदेश’चा नारा : भाजप आमदारांने घेतली अहिराणीतून शपथ!

विधानभवनात 'जय अहिराणी, जय खानदेश’चा नारा : भाजप आमदारांने घेतली अहिराणीतून शपथ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!