• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला ५ लाखांची मदत वितरित

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचा माध्यमातून मिळाला गरजू कुटुंबियांना आधार...

Team Rajmudra by Team Rajmudra
December 11, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला ५ लाखांची मदत वितरित
Spread the love

राजमुद्रा : मराठवाड्यातील धाराशिव येथील साखर कारखान्यावर काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे तांडा येथील कांतीलाल देविदास राठोड यांच्या वारसांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते ५ लाखांच्या मदतीचा धनादेश आज सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी जि.प. सभापती राजेंद्र राठोड, माजी पंचायत समिती सभापती विजय जाधव, माजी कृउबा सभापती कपिल पाटील, संजय गांधी समिती सदस्य दिनकर राठोड, जेष्ठ नेत्या नमोताई राठोड, राम पाटील आदी उपस्थित होते.

तालुक्यातील हजारो कुटुंब हे ऊसतोडणीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या साखर कारखान्यांवर जात असतात. अतिशय जोखमीचे असणारे ऊसतोडणीचे काम करत असताना अपघात होऊन आजवर अनेक ऊसतोड कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच अनेकांच्या नशिबी अपंगत्व देखील आले. मात्र भाजपा महायुती सरकारच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन झाल्याने ऊसतोड कामगारांना सुरक्षा कवच प्राप्त झाले असून या महामंडळाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील कै. कांतीलाल राठोड ऊसतोड कामगाराच्या वारसांना याचा लाभ मिळाला आहे.

वरखेडे तांडा येथील कै.कांतीलाल देविदास राठोड हे ऊसतोडणी कामानिमित्त बाणगंगा सहकारी साखर कारखाना जवळा ता.भूम जि. धाराशिव येथे गेले असता तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६.२.२०२४ रोजी घडली होती. मयत कांतीलाल राठोड यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या पश्चात कुटुंबातील सदस्यांना आधार देणे गरजेचे होते. याबाबत समाजकल्याण विभागाने आवश्यक तो प्रस्ताव तयार करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे पाठवला असता त्याला मंजुरी मिळाली व कै. कांतीलाल राठोड यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असता आज ती आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते वितरीत करण्यात आली.

Tags: jalgaonmaharashtra
Previous Post

बीड जिल्हा हादरला : संतोष खून प्रकरणातील आणखीन एक आरोपी अटकेत : पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन

Next Post

“….ऑपरेशन लोटस म्हणजे लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न” : नाना पटोलेंचा हल्लाबोल

Next Post
” भाजपा युतीला महाराष्ट्र विकणारा व्यक्ती हवाय म्हणून…”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

"....ऑपरेशन लोटस म्हणजे लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न" : नाना पटोलेंचा हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!