• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात बाळावर यशस्वी उपचार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 10, 2021
in जळगाव
0
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात बाळावर यशस्वी उपचार
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील प्री मॅच्युअर बाळावर एन. आय. सी. यु. मध्ये यशस्वी उपचार झाल्याने बाळाला जीवनदान मिळाले आहे. प्राप्त माहितीनुसार जन्मतः बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असून कावीळही झाल्याने बाळाची प्रकृती गंभीर होती. त्याला रुग्णालयातील एन. आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात येऊन तातडीने उपचार करण्यात आले. या बाळाचे तज्ञांनी केलेल्या उपचारांमुळे प्राण वाचले आहेत.

भुसावळ येथील इमरान पिंजारी यांच्या पत्नीची नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वी प्रसूती झाली होती. परिणामी बाळ श्वास घेऊ शकत नव्हते. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता हे डॉक्टरांच्या लक्षात आले. तसेच त्याला कावीळ झाला होता. वजनही कमी होते, त्यामुळे त्या प्री मॅच्युअर बाळाला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. व्हेंटीलेटर लावण्यात आले. सोबतच जीवन रक्षक औषध देण्यात आले. यात त्यांच्या वाढीसाठी आवश्यक औषधांचा समावेश होता. सहा दिवसातच बाळ यातून बाहेर आले. बाळाला २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले, कारण अशा बाळांमध्ये जिवंत राहण्याची शक्यता फार कमी असते. त्यांची आंतरिक शहरातील वाढ पाहिजे तेवढी न झाल्याने गुंतागुंत झालेली असते. मात्र रुग्णालयातील तज्ञ डॉक्‍टरांच्या पथकाला यश मिळाले आहे. काही दिवसातच बाळाचे वजन वाढून तो धोक्याबाहेर आला.

खाजगी रुग्णालयात बाळा वरील या उपचारासाठी साधारण एक ते दीड लाख रुपये लागत होते. डॉ. पाटील रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत इमरान पिंजारी यांच्या बाळावर मोफत उपचार करण्यात आले. त्यांनी रूग्णालयाचे आभार मानले आहेत. तज्ञ डॉक्टरांच्या पथकात डॉ. सुयोग तंन्नीवार, डॉ. उमाकांत अनेकर, डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. विजय गरकल यांनी प्रयत्न केले. एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध असल्याने हे शक्य झाले आहे. तज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

Tags: dr. ulhas patildr. ulhas patil vidtakiy rugnalayjalgaonvaidyakiy
Previous Post

गाळेधारकांच्या भीतीने ऐनवेळेस एकनाथ शिंदेनी घेतला काढता पाय?

Next Post

डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे युवकाला मिळाले जीवनदान

Next Post
डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे युवकाला मिळाले जीवनदान

डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे युवकाला मिळाले जीवनदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!