राजमुद्रा : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर राज्य भरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.. या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांच्या आठवणी जागवल्या.सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते नावाजलेले अर्थतज्ज्ञ अशी ओळख डॉ. मनमोहन सिंग यांनी कमावली.त्यांनी शुक्रवारी डॉ. मनमोहन सिंग यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी शोक व्यक्त केला..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विषयी आठवणी जागा केल्या..ते म्हणाले, मनमोहन सिंग हे पंतप्रधान पदी असताना आपण गुजरातचे मुख्यमंत्री होतो. यावेळी त्यांच्यासोबत कायम चर्चा व्हायची.. त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता नेहमी पाहायला मिळायची अशी आठवण त्यांनी सांगितली. देशाच्या आर्थिक धोरणावर त्यांनी दुरगामी परिणाम केले..तसेच अर्थमंत्री म्हणून ते सरकारच्या इतर अनेक खात्याची पदभार सांभाळला,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक संवेदना व्यक्त करताना एक उत्तम गुरु आणि मार्गदर्शक गमावला असल्याच ट्विट केलं..त्यांनी अफाट बुद्धी आणि सचोटीच्या जोरावर देशाचे नेतृत्व केले. त्यांची अर्थशास्त्राबद्दल असलेली सखोल जाणिवेतून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असे राहुल गांधी म्हणाले.