राजमुद्रा : राजधानी दिल्लीत गेली 27 वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या भाजपाने अखेर बाजी मारत आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. भाजपला 48 जागांवर विजय मिळाला आहे तर आप ला 22 जागावर समाधान मानावे लागले आहे.. या पराभवावर आता अरविंद केजरीवाल यांनी आपला पराभव मान्य करत जनतेने दिलेला कौल आम्हाला मंजूर अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या परभवानंतर बोलताना अरविंद केजरीवाल असेही म्हणाले की, आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेले नाही.. लोकांची सेवा करण्यासाठी राजकारण हे एक माध्यम आहे.. भलेही या निवडणुकीत आमचा पराभव झाला असेल मात्र आम्ही एक सक्षम विरोधा पक्ष म्हणून उभे राहू, तसेच समाजसेवा, जनतेच्या सुखदु:खात सहाभागी होई, वैयक्तिकक रित्या ज्याला ज्या गोष्टीची गरज असेल ती पुरवू. गेल्या दहा वर्षात आम्ही बरीच काम केली आहेत..लोकांनी मोठ्या आशेने त्यांना ( भाजप) बहुमत दिलं आहे, ते या सर्व आशा, अपेक्षा पूर्ण करोत. असे त्यांनी म्हटले आहे..
दरम्यान दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी ईव्हीमेवरून संशय व्यक्त केला आहे.. काँग्रेस आणि आप जरी सोबत लढली तरी इव्हीएम सोबत भाजप असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.. एवढं चांगलं काम करणारा केजरीवाल यांच्यासारखा माणूस स्वतः पडतो यावरून ईव्हीएम चा जोरावर आम्ही काही करू शकतो हे भाजप दाखवते असेही त्यांनी म्हटले आहे..
दिल्लीत आमची सत्ता असताना आम्ही गेल्या 10 वर्षांत बरंच काम केलं. शिक्षण क्षेत्र, आरोग्य, पाणी, वीज यावर काम करून आम्ही लोकांना आराम मिळवून देण्याचा प्रयत्न केला. दिल्लीचे इन्फ्रास्ट्रक्चरही आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही जनतेने दिलेला निर्णय मान्य करतो. असं स्पष्ट केजरीवाल म्हणाले.