• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुलभूषण पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 17, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा वाढदिवस नुकताच सर्व शासकीय नियमांचे पालन करून विविध जनहितार्थ उपक्रमांनी राबविण्यात आला. यात रक्तदान, वृक्षारोपण, अन्नदान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांसह सर्वांनी मोठ्या संख्येने उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या.

याबाबत वृत्त असे की, (ता 16) उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा वाढदिवस होता. सध्या सुरू असणार्‍या कोविडच्या आपत्तीमुळे त्यांनी वाढदिवसाला फक्त सामाजिक उपक्रम साजरा करण्याचे ठरविले होते. या अनुषंगाने पिंप्राळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने प्रारंभी रक्तदान शिबिराचे रेडक्रॉस सोसायटीच्या मदतीने आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर परिसरातील नागरिकांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर परिसरातील विविध कॉलन्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महापौरांसह शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी गजानन मालपुरे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

यानंतर महापालिकेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांना आयुक्त, उपायुक्तांसह बहुतांश नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, ज्येष्ठ नगरसेवक नितीन बरडे, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, गजानन देशमुख, पार्वताबाई भील, प्रशांत नाईक, भारत कोळी, गणेश सोनवणे, रियाझ बागवान, सरीता माळी-कोल्हे, सुनील ठाकूर, दीपक जगताप, हर्षल सनकत, शोभाताई चौधरी, विजय राठोड यांच्यासह इतर सदस्यांनी उपमहापौरांचे अभिष्टचिंतन केले. तसेच कार्यालयात अनेक सामाजिक संघटनांनी केक कापून उपमहापौरांचा वाढदिवस साजरा केला.

दरम्यान, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी गरजूंना अन्नदान करण्यात आले. नगरसेवक चेतन सनकत, सचिन पाटील, ऍड. दिलीप पोकळे, हर्षल मावळे, कुंदन काळे, उमेश सोनवणे, अमजद खान आदींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यात रेल्वेस्थानक परिसर, बस स्थानक परिसर आदींसह शहरातील विविध भागांमध्ये अन्नदान करण्यात आले.

Tags: jalgaonmahanagar palikasmajik upakramupmahapaur kulbhushan patilvadhdivas
Previous Post

श्री संत ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचा निर्णय – प्रशांत नाईक

Next Post

जिल्ह्यात १ लाख ३६ हजार ५९७ क्विं. धान्याचे होणार मोफत वाटप

Next Post

जिल्ह्यात १ लाख ३६ हजार ५९७ क्विं. धान्याचे होणार मोफत वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!