• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्या मास्टर कॉलनीतल्या बाजाराला कोणाची परवानगी ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 11, 2021
in क्राईम, जळगाव, राजकीय
1
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील मास्टर कॉलनी येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर बाजाराचे वृत्त माध्यमातुन छापून आल्यावर देखील प्रशासन कारवाई का करीत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोणाच्या परवानगीने हा बाजार रात्रीच्या वेळेत थाटण्यात येतो आहे. कोरोनाचे भयंकर संकट असतांना रुग्ण वाढ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लॉकडाऊन सोबतच कडक निर्बंध लावण्यात आले असताना सर्वत्र नियम वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहेत. हजारो लोकांची गर्दी या बाजारात होताना दिसून येत आहे. स्थानिक वृत्तपत्र, न्यूज मीडिया यांनी वेळोवेळी घटनाक्रम उघडकीस आल्यावर देखील जिल्हाप्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. प्रशासनाचा हा दुजाभाव जळगावकरांच्या जीवावर उठणारा ठरला आहे.

कोरोनामुळे अनेक नागरिकांनी जीव गमावले असताना ह्या बाजारात मात्र गर्दी होत आहे. मुंबईतील भेंडी बाजारातील बुध बाजार प्रमाणे रात्रीच्या वेळेत सर्वत्र शहरात शुकशुकाट असताना मास्टर कॉलनीत मात्र हा बाजार भरल्या नंतर रात्री ” जत्रेचे ” स्वरूप येत असून जिल्हाप्रशासनाची भूमिका याबाबत संशयास्पद वाट देणारी आहे. कोणाच्या तरी आशीर्वादाने हा बाजार भरला जात असावा त्याशिवाय पोलिसांना ही माहिती कशी मिळाली नाही? नेहमी सतर्क असणारे जळगाव पोलीस मोठ्या गुन्ह्याचा तपास सहज लावतात मात्र शहरात रात्रीच्या अंधारात चालत असलेल्या खेळाकडे कसे दुर्लक्ष करण्यात आले? याबाबत विविध तर्क लढवले जात आहे.

महिला पत्रकाराला धमकी
याबाबतचे वृत्त घेण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार नाजणीन शेख यांना लाईव्ह चित्रकरण करत असताना स्थानिक टवाळखोरांनी धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात टवाळखोरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोषींवर कठोर कार्यवाहीची मागणी राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. महिला पत्रकार नाजणीन शेख यांच्या पाठीशी राज्य पत्रकार संघ भक्कमपणे पाठशी उभे असल्याची प्रतिक्रिया प्रवीण सपकाळे यांनी दिली आहे.

Tags: corona testingjalgaon coronajalgaon craimjalgaon polismaster colani
Previous Post

कोरोना औषधी व सामग्रीवरची GST सूट धोक्याची – निर्मला सीतारमण

Next Post

होम क्वारंटाईन रुग्णांसाठी केंद्राकडून नवे नियम जाहीर

Next Post

होम क्वारंटाईन रुग्णांसाठी केंद्राकडून नवे नियम जाहीर

Comments 1

  1. संजय भाऊ तिरमले says:
    4 years ago

    काम मस्त केले आहे कोरोणाचा वाढता प्रार्दुभाव पहाता काम सलुट मारण्या सारखे आहे याला म्हणतात मिडिया

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!