• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“कॉंग्रेस अजूनही कोमामधून बाहेर आलेली नाही” पंतप्रधान नरेंद्र मोदी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 20, 2021
in राजकीय
0
“कॉंग्रेस अजूनही कोमामधून बाहेर आलेली नाही” पंतप्रधान नरेंद्र मोदी
Spread the love

 

(राजमुद्रा वृत्तसेवा) देशातील कोरोना स्थितीसंबंधी विरोधकांकडून खोटी माहिती पसरवली जात असून त्याला उत्तर द्या असा आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षातील खासदारांना दिला आहे. भाजपाच्या संसदीय समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदींनी पक्षातील खासदारांना निर्देश देताना काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसचं अस्तित्व संपत आलं तरी आमचीच चिंता असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, त्यांना वारंवार सत्य सांगा असा आग्रह यावेळी मोदींनी केला.

नकारात्मक वातावरण निर्माण तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी यावेळी केला. काँग्रेसवर टीक करताना ते म्हणाले की, “आपण इथपर्यंत आलो आहोत आणि या कोमामधून ते अजून बाहेर आलेले नाहीत. काँग्रेसचे वागणं दुर्दैवी आहे. आपण इतक्या दूरपर्यंत आलेलो आहोत आणि लसींचा तुटवडादेखील नाही हे त्यांना पचलेलं नाही. दिल्लीतही २० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे”.

“काँग्रेसला आपल्या मतदारांची चिंता नाही. आपण ६० वर्ष देशावर राज्य केलं हे अद्यापही त्यांच्या डोक्यात आहे आणि त्यामुळेच जनतेने आपली निवड केल्याचं त्यांना पचत नाही आहे. पश्चिम बंगाल, आसाममध्ये पराभव झाल्यानंतरही विरोधक म्हणून ते आपली जबाबदारी पार पाडत नाही आहेत. त्यांनी जनहिताचे मुद्दे आक्रमकपणे मांडणे अपेक्षित असताना तसं होताना दिसत नाही,” असंही यावेळी मोदी म्हणाले.

Tags: bhajapcongresscoronacorona vaccineindianarendra modipantaptradhan
Previous Post

कीटकनाशक दुष्परिणाम संदर्भात आरोग्य यंत्रणेने सजग रहावे – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लवकरच फेरबदल

Next Post
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लवकरच फेरबदल

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लवकरच फेरबदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!