(राजमुद्रा वृत्तसेवा) सध्या चर्चेत असलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे तीन वेगवेगळ्या प्रकरणात गोपनीय चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले असून चौकशीला सुरुवात झाली आहे. या गोपनीय चौकशी अंतर्गत पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक घाडगे व एपीआय अनुप डांगे यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या आधारावर राज्य सरकारने परमविर सिंह यांच्या विरोधात गोपनीय चौकशीचे आदेश जाहीर केले आहेत. तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ही चौकशी केली जाणार आहे.
●पहिले प्रकरण असे की परमवीर सिंग यांनी त्यांच्या जवळच्या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्यासंदर्भात एपीआय अनुप डांगे यांच्यावर दबाव आणला होता. या संदर्भात त्यांनी परमवीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
●दुसरे प्रकरण असे की पोलीस निरीक्षक घाडगे यांनी अकोला येथील गुन्हा दाखल केलेल्या संदर्भात ठाण्यामध्ये एफ आय आर दाखल केली होती.
●तिसरे प्रकरण असे की सोनू जलान या व्यक्तीकडून परमवीर सिंग व इतर दोन दोघांनी कोट्यावधी रुपये घेऊन त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल केला नसल्यासंदर्भात आरोप करण्यात आले आहेत.
या तीन प्रकरणासंदर्भात राज्य सरकारकडून गोपनीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत त्याअंतर्गत पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.