• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“मुख्यमंत्र्यांचा पायगुण जबाबदार, पाय बघायला पाहीजे, पांढऱ्या पायाचा” – नारायण राणे

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 25, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
“मुख्यमंत्र्यांचा पायगुण जबाबदार, पाय बघायला पाहीजे, पांढऱ्या पायाचा” – नारायण राणे
Spread the love

 

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून  मुसळधार पावसामुळे कोकण, रायगड मध्ये  दुर्घटना घडून मोठी  जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नुकतीच तळीये गावाला भेट दिली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. संपूर्ण परिस्थितीला उद्धव ठाकरे यांचा पायगुण जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राज्यातील भयावह परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्न पत्रकारपरिषदेत विचारण्यात आला. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे उत्तर दिलं. “याला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण..आल्यापासून वादळं काय? पाऊस काय? सर्व चालुच आहे. करोना काय? करोना त्यांची देण आहे. मुख्यमंत्री आले करोना घेऊन आले. पाय बघायला पाहीजे, पांढऱ्या पायाचा”, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली.

“पाठांतर करून यायचं आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचं. या राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. लोकं चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना दिली नाही. लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरीत करायला हवं होतं. जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारने करायला हवं होतं. या सर्वांना जबाबदार हे प्रशासन आहे.”, असा निशाणाही त्यांनी साधला.

दुसरीकडे, चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. “सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही.जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलं आहे.

Tags: mukhyamantri dauramukhyamantri uddhav thakrenarayan ranepaschim maharashtrapurparisthiti
Previous Post

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे विरोधकांना सणसणीत उत्तर, म्हणाले..!

Next Post

‘जिल्ह्याची विधानपरिषद ही शिवसेनेचीच’ – विष्णू भंगाळे यांचा दावा

Next Post
‘जिल्ह्याची विधानपरिषद ही शिवसेनेचीच’ – विष्णू भंगाळे यांचा दावा

'जिल्ह्याची विधानपरिषद ही शिवसेनेचीच' – विष्णू भंगाळे यांचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!