जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांची प्रकृती खरब झाल्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रिजकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत होणार्या राष्टवादीच्या बैठका व निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केलीजात आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा राष्टवादी कॉंग्रेस पक्षाच्या नूतन महानगर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदाची अधिकृत घोषणा देखील लांबणीवर पडली आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवरी होणारी मुंबईतील बैठक देखील लांबणीवर जाणार असल्याची चर्चा सूर आहे.
राज्याचे दिग्गज नेते माजी मंत्री एकनाथ खडसे भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर त्यांच्या एखाद्या निकटवर्तीयांना पहिल्यांदाच महत्वाचे पद मिळत असून पालिकेचे माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी हे जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तर माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना जिल्हाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या फेरबदलाची घोषणा लवकरच राष्ट्रवादीतर्फे केली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून अनेक महिन्यांचा कालावधी झाला आहे. या काळात त्यांच्या समर्थकांची कुठेच वर्णी लागली नव्हती. याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर अध्यक्ष पदाची जबाबदारी आता अशोक लाडवंजारी यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून हा फेरबदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.